IPL 2021: पोलार्ड कॅप्टनसी करत असूनही रोहित शर्मावर कारवाई का? जाणून घ्या कारण

IPL 2021: पोलार्ड कॅप्टनसी करत असूनही रोहित शर्मावर कारवाई का? जाणून घ्या कारण

मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) कॅप्टन रोहित शर्माला (Rohit Sharma) स्लो ओव्हर रेटमुळे 12 लाखांचा दंड आकारण्यात आला आहे.

  • Share this:

चेन्नई, 21 एप्रिल : मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) कॅप्टन रोहित शर्माला (Rohit Sharma) स्लो ओव्हर रेटमुळे 12 लाखांचा दंड आकारण्यात आला आहे. मुंबईची टीम दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) विरुद्ध मंगळवारी झालेल्या मॅचमध्ये निर्धारित वेळे ओव्हर्स पूर्ण करु शकली नाही. त्यामुळे रोहितवर ही कारवाई करण्यात आली आहे. या आयपीएल सिझनमधील मुंबईची ही पहिलीच चूक असून त्यामुळे रोहितवर आयपीएल 'कोड ऑफ कंडक्ट' नुसार कारवाई करण्यात आली आहे.

मुंबई इंडियन्सच्या बॉलिंगच्या वेळी रोहित शर्मा मैदानाच्या बाहेर होता. तर कायरन पोलार्ड कॅप्टनसी करत होता. तरीही रोहित शर्मावर दंडात्मक कारवाई का करण्यात आली? हा प्रश्न क्रिकेट फॅन्सना पडला आहे. याचं कारण म्हणजे कायरन पोलार्ड जरी मैदानावर कॅप्टनसी करत असला तरी टीम शीटवर रोहित शर्मा कॅप्टन होता. बीसीसीआयच्या नियमानुसार प्रत्येक टीमला निर्धारित 20 ओव्हर्स 90 मिनिटात पूर्ण करणे आवश्यक आहे. मुंबईला ते करण्यात अपयश आले. त्यामुळे रोहितवर ही कारवाई करण्यात आली.

आयपीएलच्या यंदाच्या मोसमात (IPL 2021) मुंबईला दुसरा पराभव स्वीकारावा लागला. दिल्लीविरुद्धच्या सामन्यात मुंबईचा  6 विकेटने पराभव झाला. टॉस जिंकून पहिले बॅटिंग घेतल्यानंतर मुंबईच्या बॅट्समननी निराशा केली. 20 ओव्हरमध्ये त्यांना फक्त 137 रन करता आले, पण मुंबईच्या बॉलरनी एवढं छोटं आव्हान असतानाही मॅच शेवटच्या ओव्हरपर्यंत खेचली.

रोहित शर्माचा जबरदस्त सिक्स पाहून रितिका-नताशासह मुंबईची गर्ल्स गँग थक्क

दिल्लीकडून शिखर धवनने सर्वाधिक 45 रन केले, तर स्मिथने 33 रनची खेळी केली. ललित यादव 22 रनवर आणि शिमरन हेटमायर 14 रनवर नाबाद राहिला. मुंबईकडून जयंत यादव, बुमराह, राहुल चहर आणि कायरन पोलार्डला एक विकेट मिळाली. मुंबई इंडियन्सची पुढची मॅच 23 एप्रिल रोजी पंजाब किंग्ज विरुद्ध होणार आहे.

Published by: News18 Desk
First published: April 21, 2021, 4:25 PM IST

ताज्या बातम्या