IPL 2021: 'आता त्याची बोलती बंद करणार' शतकानंतर माजी कॅप्टनबद्दल बटलरची प्रतिक्रिया!

IPL 2021: 'आता त्याची बोलती बंद करणार' शतकानंतर माजी कॅप्टनबद्दल बटलरची प्रतिक्रिया!

राजस्थान रॉयल्सनं (RR) रविवारी झालेल्या मॅचमध्ये सनरायझर्स हैदराबादचा (SRH) 55 रननं पराभव केला. आक्रमक ओपनिंग बॅट्समन जॉस बटलर (Jos Buttler) या विजयाचा शिल्पकार होता. बटलरनं फक्त 64 बॉलमध्ये 124 रनची खेळी केली.

  • Share this:

नवी दिल्ली, 3 मे : राजस्थान रॉयल्सनं (RR) रविवारी झालेल्या मॅचमध्ये सनरायझर्स हैदराबादचा (SRH) 55 रननं पराभव केला. राजस्थानचा या स्पर्धेतील तिसरा विजय असून त्यामुळे त्यांची टीम आता पॉईंट टेबलमध्ये पाचव्या क्रमांकावर पोहचली आहे. आक्रमक ओपनिंग बॅट्समन जॉस बटलर (Jos Buttler) या विजयाचा शिल्पकार होता. बटलरनं फक्त 64 बॉलमध्ये 124 रनची खेळी केली. बटरलरचं हे पहिलंच आयपीएल शतक आहे. या शतकानंतर बटलरला इंग्लंडचा माजी कॅप्टन एलिस्टर कुक (Alastair Cook) आठवला.

बटलरनं मॅचनंतर बोलताना सांगितलं की, "माझ्या नावावर टी20 मध्ये एक शतक जास्त आहे, असं म्हणून कूक मला नेहमी चिडवतो. मी मिडल ऑर्डरमध्ये बराच काळ क्रिकेट खेळलो आहे. तिथं शतक झळकावणं थोडं अवघड असतं. टॉप ऑर्डर बॅट्समनला याची जास्त संधी असते. अखेर मी आता कुकची बोलती बंद करेल, असं बटलरनं हसत-हसत सांगितलं."

राजस्थान रॉयल्स विरुद्ध बटलरनं 11 फोर आणि 8 सिक्स लगावले तो 19 व्या ओव्हरमध्ये संदीप शर्माच्या (Sandeep Sharma) बॉलिंगवर आऊट झाला. कर्णधार संजू सॅमसनने (Sanju Samson) त्याला चांगली साथ दिली. संजूनं  33 बॉलमध्ये 48 रन केले. बटलर - सॅमसन जोडीनं दुसऱ्या विकेटसाठी 150 रनची पार्टरनरशिप केली. रियान पराग 15 रनवर आणि डेव्हिड मिलर 7 रनवर नाबाद राहिला. हैदराबादकडून संदीप शर्मा, राशिद खान आणि विजय शंकर यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली.

IPL 2021: टीममधून काढल्यानंतर डेव्हिड वॉर्नर रडला! Photo पाहून हळहळले फॅन्स

राजस्थानने दिलेलं 221 रनचं आव्हान पार करण्यासाठी आलेल्या हैदराबादला 20 ओव्हरमध्ये 165 रन करता आले. हैदराबादच्या एकाही बॅट्समनला अर्धशतकही करता आलं नाही. मनिष पांडेने (Manish Pandey) सर्वाधिक 31 रन केले. राजस्थानच्या मुस्तफिजुर आणि क्रिस मॉरिस यांना सर्वाधिक 3-3 विकेट मिळाल्या. तर कार्तिक त्यागी आणि राहुल तेवतिया यांना प्रत्येकी 1-1 विकेट घेण्यात यश आलं.

Published by: News18 Desk
First published: May 3, 2021, 9:13 AM IST

ताज्या बातम्या