Home /News /sport /

T20 World Cup: वर्ल्ड कपपूर्वी ऑस्ट्रेलियन टीम संकटात, प्रमुख खेळाडू जखमी

T20 World Cup: वर्ल्ड कपपूर्वी ऑस्ट्रेलियन टीम संकटात, प्रमुख खेळाडू जखमी

आजवर एकदाही टी 20 वर्ल्ड कप न जिंकणाऱ्या ऑस्ट्र्लियन टीमची चिंता आगामी स्पर्धेपूर्वी वाढली (T20 World Cup) आहे. त्यांचा प्रमुख खेळाडू आयपीएल स्पर्धेत जखमी झाला आहे.

    मुंबई, 23 सप्टेंबर : आजवर एकदाही टी 20 वर्ल्ड कप न जिंकणाऱ्या ऑस्ट्र्लियन टीमची चिंता आगामी स्पर्धेपूर्वी वाढली (T20 World Cup) आहे. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (DC vs SRH) या बुधवारी झालेल्या मॅचमध्ये त्यांचा प्रमुख ऑल राऊंडर मार्कस स्टॉईनिस (Marcus Stoinis) जखमी झाला आहे. स्टॉईनिसनं त्याच्या दुसऱ्या ओव्हरच्या पहिला बॉल टाकताना जखमी झाला. त्यानंतर तो लगेच मैदानाच्या बाहेर गेला. स्टॉईनिस जखमी झाल्यानं त्याच्या ओव्हरमधील उर्वरित 5 बॉल अश्विननं टाकले. तर स्टीव्ह स्मिथनं त्याच्या जागी फिल्डिंग केली. त्यानंतर शिखर धवन, श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांच्या बॅटींगच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सनं बुधवारच्या मॅचमध्ये सनरायझर्स हैदराबादचा 8 विकेट्सनं पराभव केला. स्टॉईनिसचा पाय दुखावला गेल्याची शक्यता आहे. T20 वर्ल्ड कप स्पर्धेला एक महिन्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक असल्यानं त्याला झालेली ही दुखापत ऑस्ट्रेलियन टीमसाठी मोठा धक्का आहे. कारण, ऑस्ट्रेलियाच्या टीममध्ये स्टॉईनिसची निवड झाली आहे. टी20 क्रिकेट आणि यूएईमधील पिचवर खेळण्याचा अनुभव असलेला स्टॉईनिस हा ऑस्ट्रेलियासाठी महत्त्वाचा खेळाडू आहे. अर्थात त्याची ही दुखापत किती गंभीर आहे, याची माहिती अजून मिळालेली नाही. IPL 2021: अश्विनची बॉलिंग पाहून गंभीर नाराज, अनुभवी बॉलरला दिला 'हा' सल्ला स्टॉईनिसला पर्याय कोण? मार्कस स्टॉईनिसची दुखापत गंभीर असेल आणि तो वर्ल्ड कपमधून आऊट झाला तर त्याच्या जागी डॅन ख्रिस्टीनचा समावेश होऊ शकतो. ख्रिस्टीनला जगभरातील टी20 लीगमध्ये खेळण्याचा अनुभव आहे. तसंच त्याचा या वर्ल्ड कपसाठी ऑस्ट्रेलियाच्या राखीव खेळाडूंमध्ये समावेश करण्यात आला आहे. श्रेयस अय्यरनं दिल्लीच्या कॅप्टनसीवर मौन सोडलं, पंतबाबत केलं मोठं वक्तव्य बांगलादेश विरुद्ध नुकत्यात झालेल्या सीरिजमधील एका मॅचमध्ये ख्रिस्टीननं एका ओव्हरमध्ये 30 रन काढले होत. तसंच त्यानं बिग बॅश लीगमध्येही चांगली फटकेबाजी केली होती. पण ख्रिस्टीनची बॉलिंग ही अनेकदा महागडी ठरते. त्यामुळे स्टॉईनिस नसला तर आगामी वर्ल्ड कप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाची डोकेदुखी वाढणार आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Australia, Cricket news

    पुढील बातम्या