मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021 : उर्वरित स्पर्धेचं वेळापत्रक ठरलं! 'या' तारखेला होणार पहिली मॅच

IPL 2021 : उर्वरित स्पर्धेचं वेळापत्रक ठरलं! 'या' तारखेला होणार पहिली मॅच

कोरोना व्हायरसमुळे (coronavirus) स्थगित झालेल्या आयपीएल (IPL 2021) स्पर्धेचा 14 वा सिझन आता यूएईमध्ये होणार आहे. उर्वरित स्पर्धेचं वेळापत्रक (BCCI) बीसीसीआयने निश्चित केले आहे.

कोरोना व्हायरसमुळे (coronavirus) स्थगित झालेल्या आयपीएल (IPL 2021) स्पर्धेचा 14 वा सिझन आता यूएईमध्ये होणार आहे. उर्वरित स्पर्धेचं वेळापत्रक (BCCI) बीसीसीआयने निश्चित केले आहे.

कोरोना व्हायरसमुळे (coronavirus) स्थगित झालेल्या आयपीएल (IPL 2021) स्पर्धेचा 14 वा सिझन आता यूएईमध्ये होणार आहे. उर्वरित स्पर्धेचं वेळापत्रक (BCCI) बीसीसीआयने निश्चित केले आहे.

  मुंबई, 31 मे : कोरोना व्हायरसमुळे (coronavirus) स्थगित झालेल्या आयपीएल (IPL 2021) स्पर्धेचा 14 वा सिझन आता यूएईमध्ये होणार आहे. आयपीएलमधील बायो-बबलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यानं 29 मॅचनंतर ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली होती. बीसीसीआयच्या (BCCI) शनिवारी झालेल्या बैठकीत उर्वरित 31 मॅच यूएईमध्ये होणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उर्वरित आयपीएल स्पर्धा कधी होणार याचा कोणताही निर्णय अजून जाहीर झालेला नाही. मात्र या स्पर्धेचा दुसरा टप्पा 17 सप्टेंबर रोजी सुरु होईल तर फायनल मॅच 10 ऑक्टोबर रोजी असेल, असे वृत्त 'इनसाईड स्पोर्ट्स' ने दिले आहे. कॅरेबियन प्रीमियर लीग (CPL 2021) स्पर्धेमुळे बीसीसीआयने अद्याप स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केलेले नाही. सीपीएल 28 ऑगस्ट ते 19 सप्टेंबरपर्यंत होणार आहे. ही स्पर्धा आठवडाभर आधी संपवावी याबाबत बीसीसीआय वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाशी चर्चा करत आहे. वेस्ट इंडिज बोर्डाने हा निर्णय घेतल्यास या स्पर्धेत सहभागी होणारे खेळाडू वेळेत यूएईमध्ये दाखल होतील. याबाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, येत्या 10 दिवसांमध्ये उर्वरित आयपीएल स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर होईल. इंग्लंडच्या खेळाडूंनी देखील आयपीएलमध्ये खेळावे यासाठी बीसीसीआय प्रयत्नशील आहे. मात्र खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्याची परवानगी देण्यात येणार नाही, असे इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने यापूर्वीच जाहीर केले आहे. PSL 6 मधील अडचणी कायम, पाकिस्तानच्या माजी कॅप्टनसह 11 जणांना विमानात प्रवेश नाकारला KKR ला मोठा धक्का आयपीएलच्या उरलेल्या सामन्यांचं आयोजन करण्याची तयारी बीसीसीआय करत असतानाच कोलकाताच्या टीमला (KKR) धक्का लागला आहे. टीमचा स्टार खेळाडू आणि फास्ट बॉलर पॅट कमिन्स (Pat Cummins) आयपीएलचा उरलेला मोसम खेळणार नाही. कोलकात्याच्या टीमसाठी हा दुहेरी धक्का आहे, कारण या मोसमात टीमने चांगली कामगिरी केली नाही. 7 सामन्यांमध्ये त्यांना फक्त 2 मॅचच जिंकता आल्या, तर 5 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला. पॉईंट्स टेबलमध्ये कोलकाता सातव्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाची टीम जून महिन्यात वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर जाणार आहे. यानंतर ते अफगाणिस्तानविरुद्ध एक टेस्ट खेळतील. यानंतर ऍशेस सीरिज होणार आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यावरही पॅट कमिन्सला आराम देण्यात आला आहे. कमिन्सशिवाय ऑस्ट्रेलियाच्या अन्य खेळाडूंच्या आयपीएल खेळण्याबाबतही संशय आहे.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Cricket, IPL 2021

  पुढील बातम्या