मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2021: दिल्लीच्या पराभवानंतर पॉन्टिंगनं सांगितला पुढचा प्लॅन, 'या' खेळाडूंना करणार रिटेन

IPL 2021: दिल्लीच्या पराभवानंतर पॉन्टिंगनं सांगितला पुढचा प्लॅन, 'या' खेळाडूंना करणार रिटेन

आयपीएल पॉआईंट टेबलमध्ये (IPL 2021 Point Table) अव्वल स्थान स्थान पटकावलेल्या दिल्ली कॅपिटल्सचं (Delhi Capitals) स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे

आयपीएल पॉआईंट टेबलमध्ये (IPL 2021 Point Table) अव्वल स्थान स्थान पटकावलेल्या दिल्ली कॅपिटल्सचं (Delhi Capitals) स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे

आयपीएल पॉआईंट टेबलमध्ये (IPL 2021 Point Table) अव्वल स्थान स्थान पटकावलेल्या दिल्ली कॅपिटल्सचं (Delhi Capitals) स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे

मुंबई, 14 ऑक्टोबर: आयपीएल पॉआईंट टेबलमध्ये (IPL 2021 Point Table) अव्वल स्थान स्थान पटकावलेल्या दिल्ली कॅपिटल्सचं (Delhi Capitals) स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. आयपीएल 'प्ले ऑफ' मध्ये दिल्लीचा प्रथम चेन्नई सुपर किंग्सनं (Chennai Super Kings) पराभव केला. त्यानंतर बुधवारी झालेल्या मॅचमध्ये कोलकाता नाईट रायडर्सनं (Kolkata Knight Riders) दिल्लीचा 3 विकेट्सनं पराभव केला.

या पराभवानंतर दिल्ली कॅपिटल्सचं आयपीएल विजेतेपदाचं स्वप्न यावर्षीही भंग झालं आहे. या पराभवानंतर दिल्लीचा हेड कोच रिकी पॉन्टिंगनं (Ricky Ponting) टीमचा पुढच्या वर्षीचा प्लॅन सांगितला आहे. 'मला सर्व खेळाडूंना पुन्हा टीममध्ये पाहयला आवडेल. दिल्ली कॅपिटल्सचे सर्व खेळाडू जबरदस्त आहेत. प्लेईंग स्टाफ, कोच या सर्वांनी चांगलं काम केलं. मागील दोन सिझनमधील कामगिरीतून हे स्पष्ट होते. या पद्धतीनं सिझन समाप्त होणे हे दुर्दैवी आहे.  पण आम्हाला तीन ते चार खेळाडूंनाच रिटेन करु शकतो, याची कल्पना आहे.

आमच्या टीममधील अनेकांना पुन्हा ऑक्शनमध्ये जावं लागेल. पण मी जास्तीत जास्त खेळाडूंना परत टीममध्ये घेण्यासाठी प्रयक्न करेल. आमचे मागील तीन सिझन चांगले झाले आहेत.' दिल्ली कॅपिटल्सनं मागच्या सिझनमध्ये उपविजेतेपद पटकावले होते. या सिझनपूर्वी त्यांचा कॅप्टन श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) दुखापतग्रस्त झाला. त्यामुळे ऋषभ पंतकडं (Rishabh Pant) टीमची कॅप्टनसी सोपवण्यात आली. आयपीएलच्या सेकंड हाफमध्ये अय्यरनं टीममध्ये पुनरागमन केलं. पण, पंतलाच कॅप्टनपदी कायम ठेवण्याचा निर्णय दिल्लीच्या मॅनेजमेंटनं घेतला.

IPL 2021: विजयाच्या जवळ येऊनही ‘दिल्ली’ दूरच, मॅच हरताच पंत, पृथ्वीचे अश्रू अनावर VIDEO

दिल्ली कॅपिटल्सची निराशाजनक बॅटींग त्यांच्या केकेआर विरुद्धच्या पराभवाचं कारण ठरली. टॉस हरल्यानंतर पहिल्यांदा बॅटींगला आलेल्या दिल्लीकडून शिखर धवननं (Shikhar Dhawan) सर्वात जास्त 36 रन काढले. तर श्रेयस अय्यर 30 रन काढून नाबाद राहिला. दिल्लीच्या बॅटर्सना मोठा स्कोर करण्यात अपयश आले.

KKR ला पुढील सिझनमध्ये मिळणार नवा कॅप्टन, मॉर्गनची होणार हकालपट्टी!

केकेआरच्या स्पिनर्सनी त्यांना चांगलंच जखडून ठेवलं. त्यामुळे त्यांना 20 ओव्हर्समध्ये 5 आऊट 135 रनच करता आले. केकेआरकडून वरूण चक्रवर्तीनं (Varun Chakarvarthy) 26 रन्स देत 2 विकेट्स घेतल्या.

First published:

Tags: Delhi capitals, IPL 2021