मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021: 'द पांड्या स्वॅग', हार्दिक आणि कृणालनं केला पत्नींसोबत डान्स, पाहा VIDEO

IPL 2021: 'द पांड्या स्वॅग', हार्दिक आणि कृणालनं केला पत्नींसोबत डान्स, पाहा VIDEO

नताशानं या डान्सचा एक फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला असून त्याला 'द पांड्या स्वॅग' (The Pandya's Swag) असं नाव दिलं आहे.

नताशानं या डान्सचा एक फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला असून त्याला 'द पांड्या स्वॅग' (The Pandya's Swag) असं नाव दिलं आहे.

नताशानं या डान्सचा एक फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला असून त्याला 'द पांड्या स्वॅग' (The Pandya's Swag) असं नाव दिलं आहे.

  • Published by:  News18 Desk

चेन्नई, 19 एप्रिल: आयपीएल स्पर्धेच्या 14 व्या सिझनला (IPL 2021) सुरुवात झाली असून स्पर्धेतील 11 सामने झाले आहेत. बहुतेक सामने हे रंगतदार झाले आहेत. मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) चे स्टार ऑल राऊंडर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि कृणाल पांड्या (Krunal Pandya) हे त्यांच्या पत्नीसोबत आहेत. आयपीएल स्पर्धेत मैदानात जबरदस्त खेळ करण्यासोबतच कुटुंबासोबत धमाल करत आहेत. हार्दिक आणि त्याची पत्नी नताशा स्टेनकोविक (Natasa Stankovic) अनेकदा सोशल मीडियावर (Social Media) मजेदार व्हिडीओ शेअर करत असतात.

ही आयपीएल स्पर्धा बायो-बबलमध्ये होत आहे. मॅच आणि प्रॅक्टीस झाल्यानंतर उरलेला वेळ हे खेळाडू त्यांच्या कुटुंबीयांसोबत घालवतात. हार्दिक पांड्यानं त्याच्या ऑफिशियल इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये हार्दिक त्याची पत्नी नताशा स्टेनकोविक, कृणाल पांड्या आणि त्यांची पत्नी पंखुडी शर्मा हे चौघं जस्टीन बीबरच्या गाण्यावर डान्स करत आहेत.

नताशानं या डान्सचा एक फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला असून त्याला 'द पांड्या स्वॅग' (The Pandya's Swag) असं नाव दिलं आहे. या व्हिडीओमध्ये पांड्या ब्रदर्श, नताशा आणि पंखुडी यांनी एक सारखे कपडे घातले आहेत. तसंच चौघांच्याही शर्टवर स्माईलीचा (smile) फोटो आहे. हे चौघंही एकसारखा डान्स करत आहेत.

मुंबई इंडियन्सच्या तिसऱ्या सामन्यात हार्दिक पांड्याची  अफलातून फिल्डिंग सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या (SRH) विजयात निर्णायक ठरली आहे. पोलार्डच्या 12 व्या ओव्हरच्या तिसऱ्या बॉलला विराट सिंग पॉईंटच्या दिशेने बॉल मारत एक रनसाठी धावला, त्यावेळी हार्दिकने डायरेक्ट हिट मारून वॉर्नरला माघारी पाठवलं. 34 बॉलमध्ये 36 रन करून वॉर्नर आऊट झाला.

युजवेंद्र चहलला स्पर्धेतील पहिली विकेट मिळताच पत्नी धनश्री इमोशनल, पाहा PHOTO

यानंतर 18 व्या ओव्हरच्या चौथ्या बॉलवर हार्दिकने पुन्हा त्याचा करिश्मा दाखवला. बोल्टच्या बॉलिंगवर अब्दुल समदने मिड ऑफच्या दिशेने बॉल मारला आणि एक रनसाठी धावला. तेव्हाही हार्दिकने डायरेक्ट हिट करत अब्दुल समदला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं.

First published:

Tags: Cricket, Hardik pandya, Instagram post, IPL 2021, Krunal Pandya, Mumbai Indians