मुंबई, 29 मार्च : भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांची मालिका आता संपली आहे. रविवारी झालेल्या तिसऱ्या वन-डे मध्ये भारतानं इंग्लंडचा सात रननं पराभव केला. या विजयासह टीम इंडियानं ही मालिका 2-1 अशी जिंकली. टीम इंडियानं यापूर्वीची कसोटी मालिका ३-१ ने तर टी20 मालिका ही ३-२ ने जिंकली होती.
भारत- इंग्लंड मालिका संपताच आता सर्वांना इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या 14 व्या सिझनचे (IPL 2021) वेध लागले आहेत. ९ एप्रिलपासून ही स्पर्धा सुरु होत आहे. मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) यांच्यातील लढतीनं या स्पर्धेचा 14 वा सिझन सुरु होईल. यंदाच्या सिझनमध्ये कोणतीही टीम त्यांच्या होम ग्राऊंडवर सामना खेळणार नाही. मुंबई इंडियन्सची पहिली मॅच ही चेन्नईत होणार आहे.
भारत-इंग्लंड मालिका संपताच हार्दिक पांड्या (Hardik Pandya), कृणाल पांड्या (Krunal Pandya) आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) हे मुंबई इंडियन्सचे ते तीन खेळाडू टीममध्ये दाखल झाले आहेत. मुंबई इंडियन्सच्या टीमचा सध्या पवईतील हॉटेलमध्ये मुक्काम आहे. या हॉटेलमध्ये या तीन्ही खेळाडूंचं आगमन झालं आहे. मुंबई इंडियन्सनं त्यांच्या ट्विटर हँडलवरुन त्यांच्या आगमनाचा व्हिडीओ शेअर केला आहे.
मुंबई इंडियन्सच्या या तिन्ही खेळाडूंसाठी भारत-इंग्लंड मालिका खास होती. सूर्यकुमार यादवनं या मालिकेतून पहिल्यांदात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. भारताकडून खेळण्याचं माझं स्वप्न पूर्ण झालं आहे. तो एक अविस्मरणीय अनुभव होता, अशी भावना सूर्यकुमारने व्यक्त केली आहे.
कृणाल पांड्यानं या मालिकेतच वन-डे क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पहिल्याच मॅचमध्ये अर्धशतक झळकावून कृणालनं भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली होती. तर हार्दिक पांड्यासाठी देखील ही सीरिज चांगली ठरली. हार्दिकने तिसऱ्या वन-डे मध्ये आक्रमक अर्धशतक झळकावले. तसेच टीमच्या आवश्यकतेनुसार बॉलिंग देखील केली. आता हे तीन्ही खेळाडू मुंबई इंडियन्सला सहावे विजेतेपद मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहेत.
Pune ➡️ Mumbai and our boys have arrived at the @RenaissanceMum!
Drop a if you can't wait to see them in action at the #IPL2021 #OneFamily #MumbaiIndians @hardikpandya7 @krunalpandya24 @surya_14kumar @MarriottBonvoy pic.twitter.com/zFE7dsyehg
— Mumbai Indians (@mipaltan) March 29, 2021
( IND vs ENG : पुण्यातील मैदानातून महेंद्रसिंह धोनीसाठी Good News )
मुंबई इंडियन्सचे सामने चेन्नई, दिल्ली, बंगळुरु आणि कोलकाता या चार शहरांमध्ये होणार आहेत. या स्पर्धेची बाद फेरी 25 मे पासून अहमदाबादमध्ये सुरु होणार असून 30 मे रोजी अहमदाबादमध्येच या स्पर्धेची फायनल होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, IPL 2021, Mumbai Indians