मुंबई, 16 ऑक्टोबर: महेंद्रसिंह धोनीच्या (MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्सनं (Chennai Super KIngs) मागील आयपीएल सिझनमधील नामुष्कीचा डाग धुतला आहे. सीएसकेनं दुबईत झालेल्या आयपीएल फायनलमध्ये (IPL Final CSK vs KKR) कोलकाता नाईट रायडर्सचा 27 रननं पराभव केला. सीएसकेचा हा विजय फास्ट बॉलर शार्दुल ठाकूरसाठी (Shardul Thakur) खास आहे. कारण, आज (16 ऑक्टोबर) शार्दुलचा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या आदल्या रात्री त्यानं फक्त 2 बॉलमध्ये मॅचचं चित्र बदलत सीएसकेला चौथ्या विजेतेपदाच्या जवळ नेलं.
सीएसकेनं पहिल्यांदा बॅटींग करताना 3 आऊट 192 रन केले होते. केकेआरला जिंकण्यासाठी 193 रन हवे होते. केकेआरनं पहिल्या 10 ओव्हरमध्ये बिनबाद 88 रन काढले होते. त्यावेळी शूभमन गिल (36) आणि व्यंकटेश अय्यर (50) रन काढून खेळत होते. गिल-अय्यर जोडी चांगलीच सेट झाली होती. त्यामुळे केकेआर विजय मिळवेल असंच वाटत होतं. त्यावेळी धोनीनं शार्दुलच्या हातामध्ये बॉल दिला.
शार्दुलनं 11 व्या ओव्हरमध्ये कमाल करत फक्त 2 बॉलमध्ये मॅचचं पारडं सीएसकेच्या बाजूनं झुकवलं. शार्दुलनं त्या ओव्हरच्या चौथ्या बॉलवर व्यंकटेश अय्यरला आऊट केलं. रविंद्र जडेजानं त्याचा कॅच पकडला. त्यानंतर त्याच ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर शार्दुलनं नितीश राणाला परत पाठवलं. फाफ ड्यू प्लेसीनं त्याचा कॅच पकडला. शार्दुलनं दिलेल्या या दोन धक्क्यातून केकेआरची टीम सावरलीच नाही.
IPL 2021 Final: CSK चॅम्पियन होताच पोलार्डला फोन करण्यासाठी ब्राव्हो उतावीळ, म्हणाला...
केकेआरनं पुढील 32 रनमध्ये 6 विकेट्स गमावल्या. अखेर सीएसकेनं विजयाची औपचारिकता पूर्ण केली. केकेआरचा 27 jvvx पराभव झाला. सीएसकेच्या या विजयानंतर शार्दुल चांगलाच खूश झाला आहे. त्यानं इन्स्टाग्रामवर आयपीएल ट्रॉफीसोबतचा फोटो शेअर करत आजवरचे बेस्ट बर्थ डे गिफ्ट अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
आयपीएल इतिहासात आतापर्यंत चेन्नई सुपर किंग्सने चार वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे, तर कोलकाता नाईट रायडर्सना दोन वेळा ट्रॉफीवर आपलं नाव कोरता आलं आहे. लीग स्टेजनंतर पॉईंट्स टेबलमध्ये चेन्नईची टीम दुसऱ्या आणि कोलकाता चौथ्या क्रमांकावर राहिली. पहिल्या प्ले-ऑफमध्ये चेन्नईने दिल्लीचा पराभव करत फायनल गाठली, तर कोलकात्याने आरसीबी आणि दिल्लीचा पराभव केला आणि फायनलमध्ये प्रवेश मिळवला. चेन्नई सुपर किंग्सची ही रेकॉर्ड नववी फायनल होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Csk, IPL 2021, KKR, Shardul Thakur