मुंबई, 4 एप्रिल : आयपीएल स्पर्धेला (IPL 2021) सुरुवात होण्यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्सनं (KKR) एका खेळाडूचा टीममध्ये समावेश केला आहे. केकेआरचा रिंकू सिंह (Rinku Singh) दुखापतीमुळे पूर्ण सिझनमधून आऊट झाला आहे. रिंकूच्या जागी गुरकिरत सिंह मान (Gurkeerat Singh Mann) याचा केकेआरनं समावेश केला आहे. गुरकिरत मागच्या सिझनमध्ये विराट कोहलीच्या (Virat Kohli) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा (RCB) सदस्य होता. त्याला या सिझनपूर्वी वगळण्यात आले होते. केकेआरची पहिली मॅच 11 एप्रिल रोजी सनरायझर्स हैदराबाद (SRH) विरुद्ध होणार आहे.
केकेआरनं गुरकीरत सिंह मानला 50 लाख या त्याच्या बेस प्राईजमध्ये खरेदी केलं आहे. गुरकिरतचा हा आठवा आयपीएल सिझन आहे. मागच्या वर्षी युएईमध्ये झालेल्या आयपीएल स्पर्धेत त्याला 8 मॅचमध्ये खेळण्याची संधी मिळाली होती. यामध्ये त्याने 71 रन काढले होते. नाबाद 21 हा त्याचा सर्वोच्च स्कोअर होता. त्याला मागच्या सिझनमध्ये 80 पेक्षा कमी बॉल खेळण्याची संधी मिळाली होती. तर रिंकू सिंहनं आयपीएल स्पर्धेत 2017 साली पदार्पण केले. तो आजवर 8 आयपीएल मॅच खेळला आहे.
अनुभवी गुरकिरत
गुरकिरत हा देशांतर्गत क्रिकेट तसंच आयीएलमधील अनुभवी खेळाडू आहे. त्याने आजवर 41 आयपीएल मॅच खेळल्या आहेत. यामध्ये 21 च्या सरासरीनं 511 रन केले आहेत. 121 हा त्याचा स्ट्राईक रेट असून 65 ही सर्वोच्च धावसंख्या आहे. त्यानं त्याच्या एकूण टी20 कारकीर्दीमध्ये 113 मॅचमध्ये 24 च्या सरासरीनं 1829 रन काढले आहेत. यामध्ये 7 अर्धशतकांचा समावेश आहे.
( वाचा : IPL 2021 भोवती वाढतोय कोरोना विळखा, आता RCB च्या बड्या खेळाडूला लागण )
गुरकिरत आजवर 56 फर्स्ट क्लास आणि 90 लिस्ट ए मॅच देखील खेळला आहे. लिस्ट ए मॅचमध्ये त्याने 4 शतक आणि 23 अर्धशतक झळकावली आहेत. तर फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये एक द्विशतकाची त्याच्या नावावर नोंद आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: IPL 2021, KKR, RCB, Virat kohli