Home /News /sport /

IPL 2021: राजस्थानचा नवा खेळाडू फॉर्मात, 9 सिक्स लगावत दिला प्रतिस्पर्ध्यांना इशारा

IPL 2021: राजस्थानचा नवा खेळाडू फॉर्मात, 9 सिक्स लगावत दिला प्रतिस्पर्ध्यांना इशारा

आयपीएल स्पर्धेचं (IPL 2021) काऊंडटाऊन सुरु झालं आहे. या स्पर्धेपूर्वी राजस्थान रॉयल्सच्या नव्या खेळाडूनं 39 बॉलमध्ये 80 रन करत प्रतिस्पर्धी टीमना धोक्याचा इशारा दिला आहे.

    मुंबई, 13 सप्टेंबर: आयपीएल स्पर्धेचं (IPL 2021) काऊंडटाऊन सुरु झालं आहे. कोरोना व्हायरसमुळे ही स्पर्धा यापूर्वी स्थगित करण्यात आली होती. आता 19 सप्टेंबरपासून यूएईमध्ये याचा दुसरा टप्पा सुरु होत आहे. या स्पर्धेच्या तयारीसाठी सर्व टीम दाखल झाल्या आहेत. या स्पर्धेतून प्रमुख खेळाडूंना माघार घेतल्यानं ज्या टीमना धक्का बसला आहे, त्यामध्ये राजस्थान रॉयल्सचं (Rajasthan Royals) नाव आघाडीवर आहे. राजस्थान रॉयल्सचे जोफ्रा आर्चर (Jofra Archer), बेन स्टोक्स (Ben Stokes) आणि जोस बटलर (Jos Buttler) या खेळाडूंनी आयपीएलमधून माघार घेतली आहे. आर्चर दुखापतीमुळे, स्टोक्सनं मानसिक कारणामुळे तर बटलर कौटुंबिक कारणामुळे या आयपीएलमध्ये खेळणार नाही. यापैकी बटलरनं पहिल्या टप्प्यात शतक झळकावलं होतं. आता बटलरच्या जागी राजस्थाननं न्यूझीलंडचा विकेट किपर बॅट्समन ग्लेन फिलिप्सला (Glenn Phillips) करारबद्ध केलं आहे. फिलिप्स कॅरेबीयन प्रीमियर लीग (CPL 2021) स्पर्धेत चांगलाच फॉर्मात आहे. त्यानं बार्बाडोस रॉयल्सकडून फक्त 39 बॉलमध्ये  9 सिक्ससह 80 रनची नाबाद खेळी करत टीमला विजय मिळवून दिला. बार्बाडोसची लढत सेंट लुसीयाशी होती. सेंट लुसीयानं पहिल्यांदा बॅटींग करताना 6 आऊट 190 रन केले होते. इंग्लंडचे सर्व खेळाडू IPL मधून बाहेर पडणार, ECB च्या निर्णयानं फ्रँचायझींना धक्का त्याला उत्तर देताना बार्बाडोसच्या काईल मेयर्सनं जोरदार सुरुवात केली. त्यानं 62 बॉलमध्ये 5 फोर आणि 6 सिक्ससह 81 रन काढले. त्याला फिलिप्सनं भक्कम साथ देत बार्बाडोसला विजय मिळवून दिला. पॉईंट टेबलमध्ये सर्वात तळाशी असलेल्या बार्बाडोसचं या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलंय. पण त्यांनी शेवटच्या मॅचमध्ये विजय मिळवत स्पर्धेची सांगता केली आहे. त्याचबरोबर फिलिप्सचा हा फॉर्म राजस्थानला सुखावणारा आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news, IPL 2021

    पुढील बातम्या