• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IPL 2021: ऑस्ट्रेलियन खेळाडू परत कसं जाणार? ग्लेन मॅक्सवेलनं सांगितला Master Plan

IPL 2021: ऑस्ट्रेलियन खेळाडू परत कसं जाणार? ग्लेन मॅक्सवेलनं सांगितला Master Plan

भारतामध्ये कोरोना रुग्णांची (Covid-19) संख्या वाढल्यानंतर ऑस्ट्रेलियानं भारतामधून येणाऱ्या विमानांवर बंदी घातली आहे. त्यामुळे आयपीएलसाठी (IPL 2021) भारतामध्ये असलेल्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंना परत कसं जायचं हा प्रश्न पडला आहे.

 • Share this:
  अहमदाबाद, 30 एप्रिल : भारतामध्ये कोरोना रुग्णांची (Covid-19) संख्या वाढल्यानंतर ऑस्ट्रेलियानं भारतामधून येणाऱ्या विमानांवर बंदी घातली आहे. त्यामुळे आयपीएलसाठी (IPL 2021) भारतामध्ये असलेल्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंना परत कसं जायचं हा प्रश्न पडला आहे. तीन ऑस्ट्रेलियन खेळाडू यापूर्वीच स्पर्धेतून माघार घेऊन परत गेले आहेत. तर स्पर्धा संपल्यावर सर्वांसाठी विशेष चार्टर प्लेनची व्यवस्था करण्याची मागणी ख्रिस लीन (Chis Lynn) यानं केलं आहे. या सर्व चर्चेनंतर ऑस्ट्रेलियाचा ऑल राऊंडर ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) यानं परत कसं जायचं याचा प्लॅन सांगितला आहे. मॅक्सवेलनं एका पॉडकास्टला दिलेल्या मुलाखीमध्ये ही योजना सांगितली." आम्ही मायदेशी परत जाण्याचा रस्ता शोधत आहोत. बीसीसीआय आणि दोन्ही देशांचं सरकार या विषयावर काम करु शकतात. आम्हाला स्पर्धा संपल्यानंतर थोडा वेळ लागेल, मात्र परत कसं जायचं हे स्पष्ट असायला हवं. भारत आणि न्यूझीलंडच्या टीमला इंग्लंडमध्ये क्रिकेट खेळायचं आहे. परिस्थिती आणखी बिघडली तर आम्हाला इंग्लंडमध्ये वाट पाहावी लागेल. तसंच भारताच्या बाहेर विशेष विमानानं जावं लागेल. बहुतेक खेळाडू यावर सहमत असतील असा मला विश्वास आहे." भारत, न्यूझीलंड आणि इंग्लंडच्या खेळाडूंसोबत विमानानं इंग्लंडला जाण्याची तयारी मॅक्सवेलनं दाखवली आहे. आयपीएल संपल्यानंतर बायो बबल समाप्त होईल. त्यानंतर सर्व खेळाडूंना सुरक्षित वाताीवरणात घरी जायचं आहे. ऑस्ट्रेलियाच्या 3 खेळाडूंनी माघार घेतली आहे, अजूनही 14 खेळाडू आयपीएल खेळत आहेत. बायो-बबल संपल्यानंतर आम्हाला सुरक्षित मार्ग शोधावा लागेल, " असं मॅक्सवेलनं स्पष्ट केलं. न्यूझीलंडचे खेळाडू भारतामध्ये राहणार इंग्लंडमध्ये जून महिन्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (World Test Championship Final) होणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात हा सामना रंगेल. यासाठी भारत आणि न्यूझीलंडची टीम एकत्रच इंग्लंडला रवाना होऊ शकते. क्वारंटाईनच्या कठोर नियमांमुळे खेळाडूंना न्यूझीलंडला जाणं शक्य नाही, त्यामुळे ते भारतातच थांबतील. IPL 2021: ऋतुराजच्या फोटोवर मराठी अभिनेत्री क्लीन बोल्ड केन विलियमसन, ट्रेन्ट बोल्ट, काईल जेमिसन आणि मिचेल सॅन्टनर यांच्यासह 10  न्यूझीलंडचे खेळाडू आयपीएलसाठी भारतामध्ये आहेत. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 18 जूनपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलला सुरुवात होणार आहे. यासाठी न्यूझीलंड 15 सदस्यांच्या टीमची निवड करणार आहे. या सामन्याआधी न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात दोन टेस्ट मॅचची सीरिजही होणार आहे. ही सीरिज 2 जूनपासून इंग्लंडमध्ये सुरू होईल.
  Published by:News18 Desk
  First published: