• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IPL 2021: पंत, अय्यर नाही 'या' खेळाडूला दिल्लीचा कॅप्टन करण्याची गंभीरची सूचना

IPL 2021: पंत, अय्यर नाही 'या' खेळाडूला दिल्लीचा कॅप्टन करण्याची गंभीरची सूचना

सलग तिसऱ्या आयपीएल सिझनमध्ये 'प्ले ऑफ' गाठूनही दिल्ली कॅपिटल्सला (Delhi Capitals) विजेतेपद मिळवण्यात अपयश आले. पुढील सिझनमध्ये अय्यर किंवा पंत नाही तर एका नव्या खेळाडूला दिल्लीचा कॅप्टन करण्याची सूचना गौतम गंभीर (Gautam Gambhir) यानं केली आहे.

 • Share this:
  मुंबई, 15 ऑक्टोबर: सलग तिसऱ्या आयपीएल सिझनमध्ये 'प्ले ऑफ' गाठूनही दिल्ली कॅपिटल्सला (Delhi Capitals) विजेतेपद मिळवण्यात अपयश आले. 2019 आणि 2020 च्या सिझनमध्ये श्रेयस अय्यरनं (Shreyas Iyer) टीमचं नेतृत्त्व सांभाळलं. या सिझनपूर्वी श्रेयस जखमी झाला होता. त्यामुळे ऋषभ पंतला (Rishabh Pant) कॅप्टन करण्यात आलं होतं. श्रेयस दुखापतीनंतर परतल्यानंतरही पंतनं टीमची कॅप्टनसी सांभाळली. आयपीएलच्या पुढील सिझनच्यापूर्वी मेगा ऑक्शन (IPL 2022 Mega Auction) होणार आहे. त्यामुळे आगामी सिझनसाठी दिल्ली कोणत्या खेळाडूंना रिटेन करणार आणि कुणाला कॅप्टन करणार याची चर्चा सुरू झाली आहे. कॅप्टनपदासाठी श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांच्यात चुरस आहे.  दिल्ली कॅपिटल्सचा माजी कॅप्टन गौतम गंभीर याने मात्र श्रेयस किंवा पंत नाही तर वेगळ्याच खेळाडूचं नाव कॅप्टनपदासाठी सुचवलं आहे. दिल्लीचा स्पिनर आर. अश्विनला (R. Ashwin) टीमचा कॅप्टन करण्याची सूचना गंभीरनं केली आहे. 'क्रिकइन्फो'शी बोलताना गंभीरनं सांगितलं की, 'मी त्याच्या मोठ्या फॅनपैकी एक आहे. त्याचा जगातील सर्वश्रेष्ठ स्पिनरमध्ये समावेश होतो. तुम्ही दिल्लीची पूर्ण लाईनअप पाहिली तर हा निर्णय होऊ शकतो. हा अजब निर्णय आहे. फक्त मी याबाबत विचार करत आहे. पण, मी तिथं असतो तर पुढच्या वर्षी अश्विनलाच दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टन केलं असतं.' heartbreak last night असे ट्विट करत पंत झाला भावूक; वाचा काय म्हणाला? दिल्ली कॅपिटल्सच्या पराभवानंतर दिल्लीचा हेड कोच रिकी पॉन्टिंगनं (Ricky Ponting) टीमचा पुढच्या वर्षीचा प्लॅन सांगितला आहे. 'मला सर्व खेळाडूंना पुन्हा टीममध्ये पाहयला आवडेल. दिल्ली कॅपिटल्सचे सर्व खेळाडू जबरदस्त आहेत. प्लेईंग स्टाफ, कोच या सर्वांनी चांगलं काम केलं. मागील दोन सिझनमधील कामगिरीतून हे स्पष्ट होते. या पद्धतीनं सिझन समाप्त होणे हे दुर्दैवी आहे.  पण आम्हाला तीन ते चार खेळाडूंनाच रिटेन करु शकतो, याची कल्पना आहे, असं पॉन्टिंगनं स्पष्ट केलं आहे.
  Published by:News18 Desk
  First published: