मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2021: विराटच्या सहकाऱ्याला Bio-Bubble मध्ये थेट प्रवेश! अन्य टीम नाराज

IPL 2021: विराटच्या सहकाऱ्याला Bio-Bubble मध्ये थेट प्रवेश! अन्य टीम नाराज

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा (Royal Challengers Bangalore) ओपनिंग बॅट्समन देवदत्त पडिक्कलला (Devdutt Padikkal) कोरोनातून बरं झाल्यानंतर थेट टीमच्या बयो-बबलमध्ये (Bio-Bubble) प्रवेश देण्यात आला आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा (Royal Challengers Bangalore) ओपनिंग बॅट्समन देवदत्त पडिक्कलला (Devdutt Padikkal) कोरोनातून बरं झाल्यानंतर थेट टीमच्या बयो-बबलमध्ये (Bio-Bubble) प्रवेश देण्यात आला आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा (Royal Challengers Bangalore) ओपनिंग बॅट्समन देवदत्त पडिक्कलला (Devdutt Padikkal) कोरोनातून बरं झाल्यानंतर थेट टीमच्या बयो-बबलमध्ये (Bio-Bubble) प्रवेश देण्यात आला आहे.

मुंबई, 10 एप्रिल : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा (Royal Challengers Bangalore) ओपनिंग बॅट्समन देवदत्त पडिक्कलला (Devdutt Padikkal) कोरोनातून बरं झाल्यानंतर थेट टीमच्या बयो-बबलमध्ये (Bio-Bubble) प्रवेश देण्यात आला आहे. या निर्णयावर अन्य आयपीएल टीमनं नाराजी व्यक्त केली आहे. देवदत्तला सात दिवसांचा बंधनकारक क्वारंटाईन कालावधी पूर्ण न करताच बायो-बबलमध्ये प्रवेश देण्यात आला आहे. देवदत्तला 22 मार्च रोजी कोरोना झाला होता. त्यानंतर तो होम क्वारंटाईन होता. कोरोनातून बरं होताच 7 एप्रिल रोजी तो आरसीबीच्या टीममध्ये दाखल झाला आहे.

आरसीबीच्या मॅनेजमेंटमधीाल सदस्यानं या विषयावर 'क्रिकबझ'शी बोलताना सर्व नियमांचं पालन केल्याचा दावा केला आहे. देवदत्तचे तीन कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह आले होते. त्यानंतर तो 7 एप्रिल रोजी टीममध्ये दाखल झाला. बीसीसीआयच्या नियमानुसार त्याचे सर्व रिपोर्ट निगेटीव्ह होते, असं या सदस्यानं सांगितलं. अन्य टीमनं मात्र यावर नाराजी व्यक्त केली आहे. 'घरामध्ये क्वारंटाईन राहण्याची परवानगी होती, तर आमच्या अनेक सदस्यांनी तसं केलं असतं,' असं मत एका टीमच्या अधिकाऱ्यानं व्यक्त केलं आहे.

BCCI चा नियम काय सांगतो?

बीसीसाआयनं 19 मार्च रोजी आयपीएलशी संबंधित सर्वांना कोरोना प्रोटोकॉल पाठवला होता. त्यामध्ये कोणत्याही टीमच्या बायो-बबलमध्ये प्रवेश करण्यापूर्वी हॉटेलमध्ये सात दिवसांचा क्वारंटाईन कालावधी बंधनकारक असल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं. टीममधील सदस्यांना बायो-बबलमध्ये प्रवेश करण्यापूर्वी हॉटेलातील रुममध्ये 7 दिवस क्वारंटाईन राहावं लागेल.

हॉटेलमध्ये प्रवेश केल्यानंतर बायो-बबलमध्ये प्रवेश करण्यापूर्वी टीमच्या सर्व सदस्यांना आरटी-पीसीआर टेस्ट द्यावी लागेल. त्यानंतर त्यांची स्वॅब टेस्ट घेतली जाईल. प्रत्येकाचे तीन कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह येणं बंधनकारक आहे. ही सर्व प्रक्रीया पार पडल्यानंतरच टीमच्या बायो-बबलमध्ये प्रवेश करण्याची परवानगी असेल.

एखादा खेळाडू उशीरा बायो-बबलमध्ये प्रवेश करणार असेल तर त्याला टीमच्या हॉटेलमध्येच 7 दिवस क्वारंटाईन राहवं लागेल. मात्र त्याला हा कालावधी टीमच्या बायो-बबल झोनच्या बाहेर घालवावा लागेल. त्या खेळाडूला हॉटेलमधील दुसऱ्या विंगमध्ये किंवा मजल्यावर ठेवले जाईल. सात दिवसांच्या कालावधीमधील दुसऱ्या, पाचव्या आणि सातव्या दिवशी त्याचा कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह आला तरच त्याला बायो-बबलमध्ये प्रवेश दिला जाईल.

डीव्हिलिर्यसच्या खेळीनं रोहितची टीम पराभूत! सेहवागची मजेदार कमेंट Viral )

देवदत्त पडिक्कलच्या  बाबतीतही या सर्व नियमांचं पालन करणे आवश्यक होतं, असं मत अन्य टीमनं व्यक्त केलं आहे.

First published:

Tags: IPL 2021, RCB