• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IPL 2021: 'मॉर्गनची हकालपट्टी करा', माजी क्रिकेटपटूचा KKR ला सल्ला! नव्या कॅप्टनचं सांगितलं नाव

IPL 2021: 'मॉर्गनची हकालपट्टी करा', माजी क्रिकेटपटूचा KKR ला सल्ला! नव्या कॅप्टनचं सांगितलं नाव

आयपीएल स्पर्धेच्या सेकंड हाफमध्ये (IPL 2021, Second Phase) कोलकाता नाईट रायडर्सचा (Kolkata Knight Riders) कॅप्टन इयन मॉर्गनची (Eoin Morgan) कामगिरी निराशाजनक झाली आहे. मॉर्गननं 4 मॅचमध्ये फक्त 17 रन केले आहेत.

 • Share this:
  मुंबई, 2 ऑक्टोबर : आयपीएल स्पर्धेच्या सेकंड हाफमध्ये (IPL 2021, Second Phase) कोलकाता नाईट रायडर्सचा (Kolkata Knight Riders) कॅप्टन इयन मॉर्गनची (Eoin Morgan) कामगिरी निराशाजनक झाली आहे. मॉर्गननं 4 मॅचमध्ये फक्त 17 रन केले आहेत. त्यामध्ये त्यानं एकदाही दोन आकडी रन केलेले नाहीत. पंजाब किंग्ज विरुद्ध शुक्रवारी झालेल्या मॅचध्ये देखील टीमला गरज असताना मॉर्गन फक्त 2 रन काढून आऊट झाला. मॉर्गनच्या खराब कामगिरीमुळे त्याच्या टीममधील जागेवर प्रश्न उपस्थित झाला आहे. माजी भारतीय क्रिकेटपटू आकाश चोप्रा (Aakash Chopra) यानं मॉर्गनची टीममधून हकालपट्टी करा असा सल्ला केकेआरच्या (KKR) मॅनेजमेंटला दिला आहे. मॉर्गनच्या जागी बांगलादेशचा ऑल राऊंडर शाकिब अल हसनला (Shakib Al Hasan) कॅप्टन करावं असं मत आकाशनं व्यक्त केलं आहे.  मॉर्गनच्या खराब फॉर्ममुळे केकेआरची टीम अडचणीत सापडली असून पंजाब विरुद्धच्या पराभवानंतर त्यांची स्पर्धेतील वाटचाल खडतर झाली आहे. आकाशनं ट्विट करत मॉर्गनला कॅप्टनपदावरुन काढण्याचा सल्ला दिला आहे. 'कठीण परिस्थितीमध्ये कठोर नि्र्णय घ्यावे लागतात. केकेआरच्या उर्वरित मॅचसाठी शाकिब अल हसनला कॅप्टन करण्याबाबत काय मत आहे? शाकिब त्याच्या बॅटींगसोबत काही ओव्हर्स बॉलिंग देखील करु शकतो. माझ्या मनात मॉर्गनच्या विरोधात कोणतीही भावना नाही. पण रन  होत नसतील तर ती गोष्ट हातामध्ये नाही. सर्वश्रेष्ठ खेळाडूच्या बाबतीतही असं होऊ शकतं.' असं मत आकाशनं व्यक्त केलं आहे. KKR सध्या चौथ्या क्रमांकावर कोलकाता नाईट रायडर्सची टीम सध्या आयपीएल पॉईंट्स टेबलमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. दोन वेळा आयपीएल स्पर्धा जिंकणाऱ्या टीमनं 12 पैकी 5 मॅच जिंकल्या आहेत. शुक्रवारी पंजाबविरुद्ध झालेल्या मॅचमध्ये कोलकातानं 165 रनचा आव्हानात्मक स्कोअर केला होता. त्यानंतरही पंजाबनं त्यांचा पाच विकेट्सनं पराभव केला. IPL 2021: मॉर्गनचा फॉर्म बनला KKR ची डोकेदुखी, कॅप्टनच्या नावावर लाजिरवाण्या विक्रमाची नोंद केकेआरच्या या आयपीएलच्या लीग स्टेजमधील आणखी दोन मॅच बाकी आहेत. त्यांची पुढील लढत 3 ऑक्टोबर रोजी सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध आहे. तर 7 ऑक्टोबर रोजी शेवटचा सामना राजस्थान रॉयल्सशी होणार आहे. 'प्ले ऑफ' ची आशा कायम ठेवण्यासाठी केकेआरला उर्वरित दोन सामने कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकावे लागतील.
  Published by:News18 Desk
  First published: