मुंबई, 25 एप्रिल: या आयपीएल स्पर्धेत (IPL 2021) मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि केकेआरचा (KKR) कॅप्टन इयन मॉर्गन (Eoin Morgan) यांना स्लो ओव्हर रेटमुळे (Slow over rate) दंड झाला आहे. या निर्णयावर इंग्लंजचा माजी बॅट्समन केव्हिन पीटरसन (Kevin Pietersen) खूश आहे. झटपट क्रिकेटमध्ये उशीर होण्याला काहीही स्थान नाही. टी20 क्रिकेट हे एक मनोरंजन पॅकेज आहे. यामध्ये काहीही छेडछाड मंजूर नाही.
''रोहित शर्मा आणि इयन मॉर्गन यांना प्रत्येकी 12 लाखांचा दंड झाला आहे. हा सर्व खेळाडूंसाठी चांगला संदेश आहे. टी 20 हे एक मनोरंजन पॅकेज आहे. यामध्ये फोर, सिक्स, विकेट, खराब फिल्डिंग या सर्वांना जागा आहे, पण संथपणाला नाही. प्रेक्षकांना सारं काही तीन तासांमध्ये हवं असतं.'' असं पीटरसननं 'बेटवे डॉट कॉम'साठी लिहलेल्या ब्लॉगमध्ये लिहलं आहे.
यापूर्वी होता दंड!
पीटरसननं या लेखात एक जुना किस्सा देखील सांगितला आहे. तो 2004 साली पहिल्यांदा टी20 मॅच खेळत होता त्यावेळी स्कोअरबोर्डवर टाईमर सेट केला होता तसंच निर्धारित वेळेत ओव्हर्स पूर्ण करणे आवश्यक होते. याबाबतीत कोणतीही तडजोड केली जात नव्हती, असं पीटरसननं सांगितलं.
आयपीएलमधील नियम काय सांगतो?
प्रत्येक टीमला 90 मिनिटांत 20 ओव्हर पूर्ण करणं अपेक्षित आहे. यापूर्वी 90 व्या मिनिटाला 20 वी ओव्हर सुरू करावी असा नियम होता, पण आता निर्धारित दीड तासाच्या आत 20 ओव्हर पूर्ण कराव्या लागणार आहेत. शिवाय या 90 मिनिटांत टीमला अडीच मिनिटांचा दोनदा टाइम आऊटही मिळणार आहे. म्हणजेच प्रत्येक टीमला 85 मिनिटांत एकूण 20 ओव्हर टाकणं अपेक्षित आहे. त्यानुसार प्रत्येक टीमला एका तासामध्ये 14.1 ओव्हर टाकावी लागतील.
IPL 2021: बुमराहपेक्षा 'या' भारतीय बॉलर्समध्ये गुणवत्ता जास्त, नेहराचा दावा
यंदाच्या आयपीएलमध्ये एमएस धोनी आणि रोहित शर्माला दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या (Delhi Capitals) मॅचसाठी तर इयन मॉर्गनला चेन्नईविरुद्धच्या सामन्यासाठी हा दंड भरावा लागला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, IPL 2021, KKR, Mumbai Indians, Rohit sharma, Sports