मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021: डेव्हिड वॉर्नरवर SRH नं केला आणखी एक अन्याय, भावुक होत माजी कॅप्टन म्हणाला...

IPL 2021: डेव्हिड वॉर्नरवर SRH नं केला आणखी एक अन्याय, भावुक होत माजी कॅप्टन म्हणाला...

ऑस्ट्रेलियाचा आक्रमक खेळाडू डेव्हिड वॉर्नरसाठी (David Warner) हा आयपीएल सिझन (IPL 2021) चांगलाच त्रासदायक ठरला. या सिझनच्या सुरुवातील वॉर्नर हैदराबादचा कॅप्टन होता. पण, स्पर्धेच्या शेवटच्या टप्प्यात तर त्याला डग आऊटमध्येही जागा मिळाली नाही.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

मुंबई, 10 ऑक्टोबर: आयपीएल स्पर्धेचा हा सिझन (IPL 2021) सनरायझर्स हैदराबादसाठी (Sunrisers Hyderabad) चांगलाच निराशाजनक ठरला. हैदराबादनं 14 पैकी फक्त 3 मॅच जिंकल्या. त्यामुळे टीम पॉईंट टेबलमध्ये शेवटच्या क्रमांकावर फेकली गेली. ऑस्ट्रेलियाचा आक्रमक खेळाडू डेव्हिड वॉर्नरसाठी (David Warner) देखील हा सिझन चांगलाच त्रासदायक ठरला. या सिझनच्या सुरुवातील वॉर्नर हैदराबादचा कॅप्टन होता. पण, स्पर्धेच्या शेवटच्या टप्प्यात तर त्याला डग आऊटमध्येही जागा मिळाली नाही.

हैदराबादच्या खराब कामगिरीचं खापर वॉर्नरवर फोडण्यात आलं. त्याची कॅप्टनपदावरुन हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर त्याला प्लेईंग 11 मधूनही वगळण्यात आले. यूएईमध्ये झालेल्या आयपीएलच्या सेकंड फेजमध्ये वॉर्नर फक्त 2 मॅच खेळला. यामध्ये त्यानं 0 आणि 2 रन काढले. त्यानंतर वॉर्नरला काही मॅच टीमच्या बसमध्येही प्रवेश देण्यात आला नाही. कारण टीमच्या पहिल्या 18 खेळाडूंमध्येही त्याचा समावेश नव्हता.

सनरायझर्स हैदराबादनं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आल्यानंतर एक फेवरवेल व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये कॅप्टन केन विल्यमसन, हेड कोच ट्रेवर बेलिससह अनेक खेळाडू आणि सपोर्ट स्टाफनं फॅन्सचे आभार व्यक्त केले आहेत. मात्र या व्हिडीओमध्ये वॉर्नरचा समावेश नाही. हा व्हिडीओ प्रसिद्ध होताच फॅन्सनी त्याबाबत अनेक प्रश्न विचारले.

हैदराबादचा प्रत्येक फॅन फक्त वॉर्नरबद्दलच प्रश्न विचारत होता. त्यानंतर वॉर्नरनं याबाबत दिलेलं उत्तर वाचून सर्वांनाच धक्का बसला. 'मला या व्हिडीओत सहभागी होण्यास सांगितले नव्हते. त्यामुळे मी यामध्ये नाही. असं उत्तर वॉर्नरनं दिलं.

यापूर्वी हैदराबादच्या शेवटच्या मॅचनंतर वॉर्नरनं एक भावुक पोस्ट लिहून सर्व फॅन्सचे आभार व्यक्त केले होते. 'अविस्मरणीय आठवणी दिल्याबद्दल सर्वांचे आभार. 'आमच्या टीमच्या सदैव पाठीशी  राहून प्रोत्साहन देणाऱ्या चाहत्यांचे आभार. तुम्ही दिलेल्या पाठिंब्यासाठी माझे आभाराचे दोन शब्दही कमी पडतील. हा सुखचा प्रवास होता. मी आणि माझे कुटुंबीय तुम्हा सर्वांना मिस करू.' अशी भावना वॉर्नरनं व्यक्त केली आहे.

IPL 2021: डेव्हिड वॉर्नरच्या खराब फॉर्मवर आली ऑस्ट्रेलियन कॅप्टनची प्रतिक्रिया, म्हणाला...

First published:

Tags: David warner, IPL 2021, SRH