मुंबई, 16 ऑक्टोबर: महेंद्रसिंह धोनीच्या (MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्सनं (IPL 2021 CSK Champions) आयपीएल स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. सीएसकेचं हे चौथं आयपीएल विजेतेपद आहे. सीएसकेनं यापूर्वी 2010, 2011 आणि 2018 साली विजेतेपद पटकावले होते. या विजयबरोबरत सीएसकेवर धनवर्षावर झालं आहे. या टीमला प्रतिष्ठेच्या आयपीएल ट्रॉफी बरोबरच सात प्राइज मनीच्या रुपात 20 कोटी रुपये (IPL 2021 Final Prize Money) मिळाले आहेत.
आयपीएल स्पर्धेच्या उपविजेत्या केकेआरला 12.50 कोटींचं पक्षीस मिळालं आहे. फायनलमध्ये 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार पटकावणाऱ्या फाफ ड्यू प्लेसीला 5 लाखांचं बक्षीस मिळालं आहे. या आयपीएलमध्ये सर्वात जास्त 32 विकेट्स घेणाऱ्या हर्षल पटेलला पर्पल कॅपसह 10 लाख रुपयांचं बक्षिस मिळालं आहे. त्याचबरोबर त्यानं गेमचेंजर ऑफ द सिझन आणि मोस्ट व्हॅल्यूबल प्लेयर ऑफ द सिझन हा पुस्कारही जिंकला असून या पुरस्कारासाठी त्याला प्रत्येकी 10-10 लाख रुपये मिळाले आहेत.
या सिझनमध्ये सर्वात जास्त 635 रन काढणाऱ्या सीएसकेच्या ऋतुराज गायकवाडला ऑरेंज कॅप आणि बक्षीस म्हणून 10 लाख रुपये मिळाले आहेत. त्याचबरोबर ऋतुराजला इमर्जिंग प्लेयर ऑफ द सिझन पुरस्कारही मिळाला आहे. बीसीसीआयमं यापूर्वी 2020 मध्ये कोरोना महामारीचं कारण देत खर्च कमी करण्यासाठी आयपीएल पुरस्काराची रक्कम अर्धी करण्याचा निर्णय घेतला होता. यानुसार विजेत्या टीमला 10 कोटी तर उपविजेत्या टीमला 6.25 कोटी रुपये मिळणार होते. पण नंतर त्यांनी हा निर्णय बदलला.
आयपीएल प्ले ऑफ मधील (IPL 2021 Play offs) अन्य टीम रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) आणि दिल्ली कॅपिटल्स यांना 8.75 कोटींचं बक्षीस मिळालं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.