Home /News /sport /

IPL 2021 Final: धोनीच्या कठोर टीकाकाराचा बदलला सूर, फायनलपूर्वी केली माहीची प्रशंसा!

IPL 2021 Final: धोनीच्या कठोर टीकाकाराचा बदलला सूर, फायनलपूर्वी केली माहीची प्रशंसा!

महेंद्रसिंह धोनीनं (MS Dhoni) आंतरराष्ट्रीय क्रिकेटला मागच्या वर्षीच अलविदा केला आहे. वर्षभरानंतरही त्याच्या कॅप्टनसीची हुकूमत कायम आहे. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध झालेल्या क्वालिफायरमध्ये (CSK vs DC) त्यानं हे दाखवून दिलं आहे.

    मुंबई, 15 ऑक्टोबर: महेंद्रसिंह धोनीनं (MS Dhoni) आंतरराष्ट्रीय क्रिकेटला मागच्या वर्षीच अलविदा केला आहे. वर्षभरानंतरही त्याच्या कॅप्टनसीची हुकूमत कायम आहे. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध झालेल्या क्वालिफायरमध्ये (CSK vs DC) त्यानं हे दाखवून दिलं आहे. आता आयपीएल फायनलमध्ये चेन्नई सुपर किंग्सची (Chennai Super Kings) लढत कोलकाता नाईट रायडर्सशी होणार आहे. ही मॅच जिंकली तर धोनीच्या कॅप्टनसीमध्ये सीएसकेचे हे चौथे आयपीएल विजेतेपद असेल. टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरनं (Gautam Gambhir) आयपीएल फायनलपूर्वी धोनीची जोरदार प्रशंसा केली आहे. धोनीचा टीकाकार म्हणून गंभीर ओळखला जातो. मात्र फायनलपूर्वी इयन मॉर्गनशी तुलना करताना त्याचे सूर बदलले आहेत. धोनी हा मॉर्गनपेक्षा सरस असल्याचं गंभीरनं सांगितलं. गंभीर क्रिकइन्फोशी बोलताना म्हणाला की, 'धोनी आणि मॉर्गनच्या फॉर्मची तुलना करणे चूक आहे. कारण धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तर मॉर्गन राष्ट्रीय टीमचा कॅप्टन आहे. तुम्ही सफरचंदाची तुलना संत्र्याशी करु शकत नाही. धोनी बराच काळापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. तो फॉर्मात नसेल तर समजू  शकते. दुसरिकडं मॉर्गन आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतोय. तरीही तुम्ही आयपीएल स्पर्धेत दोघांच्या बॅटींगची तुलना केली तर धोनीची कामगिरी मॉर्गनपेक्षा चांगली आहे. IPL 2021 Final: KKR घेणार मोठा निर्णय, कॅप्टन मॉर्गनची होणार टीममधून हकालपट्टी! धोनीवर तीन गोष्टींची जबाबदारी (कॅप्टनसी, बॅटींग आणि विकेटकिपिंग) आहे. तर मॉर्गन कॅप्टन आणि बॅटर आहे. यापैकी एकामध्ये त्याची कामगिरी अगदीच खराब आहे. तर धोनीनं एक कॅप्टन आणि विकेट किपर म्हणून चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे या दोघांच्या फॉर्मची तुलना करणे चूक आहे. धोनीनं आयपीएल 2021 मध्ये आत्तापर्यंत 15 मॅचमध्ये 16 च्या सरासरीनं 114 रन काढले आहेत. त्यानं या सिझनमध्ये फक्त 12 फोर आणि 3 सिक्स लगावलेत. तसंच 13 कॅच घेतल्या आहेत. एक बॅटर म्हणून धोनीचा हा सर्वात खराब आयपीएल सिझन आहे. त्यानं मागील आयपीएल स्पर्धेत 14 मॅचमध्ये 200 रन केले होते. Captain Cool धोनी करणार असा विक्रम, जो आजवर ना कुणी केला ना कुणाला जमला वर्ल्ड कप विजेता कॅप्टन मॉर्गननं या आयपीएल सिझनमध्ये (IPL 2021) सपशेल निराशा केली आहे. मॉर्गननं या आयपीएलधील 16 मॅचमध्ये फक्त 129 रन केले आहेत. यामध्ये त्याची सरासरी 11.72 असून स्ट्राईक रेट 100 पेक्षा कमी आहे. एकाच आयपीएल सिझनमध्ये 4 वेळा शून्यावर आऊट झालेला तो पहिला कॅप्टन आहे. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध बुधवारी झालेल्या मॅचमध्येही तो शून्यावर आऊट झाला होता.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Gautam gambhir, IPL 2021, MS Dhoni

    पुढील बातम्या