Home /News /sport /

KKR vs CSK Dream 11 Team Prediction: 'या' 11 खेळाडूंवर आजमवा तुमचं भविष्य

KKR vs CSK Dream 11 Team Prediction: 'या' 11 खेळाडूंवर आजमवा तुमचं भविष्य

संपूर्ण क्रिकेट विश्वाचं लक्ष लागलेली कोलकता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) ही आयपीएल फायनल आज (शुक्रवारी) होणार आहे.

    मुंबई, 15 ऑक्टोबर: संपूर्ण क्रिकेट विश्वाचं लक्ष लागलेली कोलकता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) ही आयपीएल फायनल आज (शुक्रवारी) होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार  संध्याकाळी 7.30 वाजता ही मॅच सुरू होईल. सीएसकेनं (CSK) पहिल्या क्वालिफायर मॅचमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला होता. तर केकेआरनं एलिमेनटरमध्ये आरसीबी आणि दुसऱ्या क्वालिफायरमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करत फायनलमध्ये धडक मारली आहे. या सिझनमध्ये चेन्नईचं पारडं केकेआरवर जड आहे. भारतामध्ये झालेल्या पहिल्या हाफमधील मॅचमध्ये चेन्नईनं केकेआरचा 18 रननं पराभव केला होता. तर यूएई लीगमध्ये 2 विकेट्सनं विजय मिळवला होता. सीएसकेची टीम 9 व्यांदा आयपपीएल फायनलमध्ये पोहचली असून त्यांनी यापूर्वी 3 वेळा आयपीएल विजेतेपद पटकावलं आहे. केकेआरनं 2014 नंतर पहिल्यांदाच आयपीएल फायनलमध्ये धडक मारली आहे. यापूर्वी 2012 आणि 2014 साली केकेआरनं आयपीएलचं विजेतेपद पटकावलं आहे. यंदा तिसरं विजेतेपद पटकावण्याची या टीमला संधी आहे. केकेआरचे बॉलर्स या सिझनमध्ये फॉर्मात आहेत. तर चेन्नईची बॅटींग ऑर्डर तगडी आहे. त्यामुळे या फायनलमध्ये दोन्ही टीममध्ये रंगतदार मुकाबला पाहयला मिळणार आहे. IPL 2021 Final: आयपीएलमधील हिट जोडी आहे KKR च्या विजेतेपदातील मोठा अडथळा CSK vs KKR Dream 11 कॅप्टन - ऋतुराज गायकवाड व्हाईस कॅप्टन - व्यंकटेश अय्यर विकेटकिपर - महेंद्रसिंह धोनी बॅटर - फाफ ड्यू प्लेसी, शुभमन गिल ऑल राऊंडर्स - सुनील नरेन, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर बॉलर्स - लॉकी फर्ग्युसन, जोश हेजलवूड, वरुण चक्रवर्ती IPL 2021 Final: 'या' भारतीय खेळाडूला शेवटची संधी, फेल गेला तर करिअर समाप्त? संभाव्य Playing 11 कोलकाता नाईट रायडर्स : शुभमन गिल, व्यंकटेश अय्यर, राहुल त्रिपाठी, नितिश राणा, दिनेश कार्तिक, इयन मॉर्गन, शाकीब अल हसन/आंद्रे रसेल, सुनील नरीन, लॉकी फर्ग्युसन, शिवम मावी, वरुण चक्रवर्ती चेन्नई सुपर किंग्स : ऋतुराज गायकवाड, फाफ डुप्लेसी, मोईन अली, रॉबिन उथप्पा, अंबाती रायडू, रविंद्र जडेजा, महेंद्रसिंह धोनी, ड्वेन ब्रावो, शार्दुल ठाकुर, दीपक चाहर आणि जोश हेजलवूड.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: IPL 2021, KKR, SRH

    पुढील बातम्या