मुंबई, 16 ऑक्टोबर : चेन्नई सुपर किंग्सनं (Chennai Super KIngs) आयपीएल फायनलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) पराभव करत आयपीएल स्पर्धेचे विजेतेपद मिळवले आहे. या स्पर्धेत चेन्नईच्या खेळाडूंनी शेवटपर्यंत योगदान दिले. या सांघिक प्रयत्नामधनूच चेन्नईनं आयपीएल स्पर्धेचं विजेतेपद पटाकवलं आहे. या विजेतेपदानंतर चेन्नईचे फॅन्स सध्या आनंदात आहेत. पण, त्याचवेळी त्यांच्या एका लाडक्या खेळाडूचं करिअर यामुळे समाप्त झालं आहे.
सीएसकेनं फायनल आणि त्यापूर्वीच्या काही मॅचमधून स्टार खेळाडू सुरेश रैना (Suresh Raina) टीमच्या बाहेर बसवलं होतं. आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच रैना सीएसकेकडून आयपीएल फायनल खेळला नाही. त्याच्या जागेवर रॉबिन उथप्पाला संधी देण्यात आली. रैना या सिझनमघ्ये फॉर्मात नव्हता. त्याचा फटका त्याला बसला. आता पुढच्या सिझनमध्ये सीएसके त्याला रिटेन करण्याची शक्यता नाही.
सुरेश रैना क्रिकेट विश्वात मिस्टर आयपीएल म्हणून ओळखला जातो. या स्पर्धेत रैनाचा रेकॉर्ड जबरदस्त असल्यानं त्याला हे नाव मिळालं आहे. रैनानं या स्पर्धेत एकूण 205 मॅचमध्ये 32.51 च्या सरासरीनं आणि 136.76 च्या स्ट्राईक रेटनं 5528 रन काढले आहेत. आयपीएलमध्ये सर्वाधिक रन काढणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो विराट कोहलीनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. रैनाची बॅट या सिझनमध्ये शांत होती. त्यानं 12 मॅचमध्ये 18 च्या सरासरीनं 160 रन काढले आहे. या सिझनमध्ये रैनानं केवळ 1 अर्धशतक झळकावलं.
चौथ्या आयपीएल विजेतेपदानंतर रिटायरमेंटबद्दल काय म्हणाला धोनी? VIDEO
34 वर्षांचा सुरेश रैना हा चेन्नई सुपर किंग्सचा सर्वात मोठा मॅच विनर आहे. त्यानं मागच्या वर्षी धोनीसोबतच आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला होता. त्यानंतर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. त्याचाही परिणाम रैनाच्या फॉर्मवर झाला आहे. या आयपीएलमध्ये झगडणाऱ्या रैनाला पुढच्या वर्षी कोणतीही टीम खरेदी करण्यात स्वारस्य दाखवणार नाही, अशी शक्यता आहे. त्यामुळे रैना येत्या काळात आयपीएलमधूनही रिटायरमेंट जाहीर करेल अशी चर्चा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.