मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2021 Final: 'तुम्ही UAE मध्ये हव्या होता', ऋतुराजच्या ऐतिहासिक कामगिरीनंतर फॅन्सना आठवली सायली

IPL 2021 Final: 'तुम्ही UAE मध्ये हव्या होता', ऋतुराजच्या ऐतिहासिक कामगिरीनंतर फॅन्सना आठवली सायली

चेन्नई सुपर किंग्सनं कोलकाता नाईट रायडर्सचा 27 रननं पराभव करत (IPL Final CSK vs KKR) चौथ्यांदा आयपीएल स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. चेन्नईचं हे विजेतेपद त्यांचा ओपनर ऋतुराज गायकवाडसाठी (Ruturaj Gaikwad) खास आहे.

चेन्नई सुपर किंग्सनं कोलकाता नाईट रायडर्सचा 27 रननं पराभव करत (IPL Final CSK vs KKR) चौथ्यांदा आयपीएल स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. चेन्नईचं हे विजेतेपद त्यांचा ओपनर ऋतुराज गायकवाडसाठी (Ruturaj Gaikwad) खास आहे.

चेन्नई सुपर किंग्सनं कोलकाता नाईट रायडर्सचा 27 रननं पराभव करत (IPL Final CSK vs KKR) चौथ्यांदा आयपीएल स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. चेन्नईचं हे विजेतेपद त्यांचा ओपनर ऋतुराज गायकवाडसाठी (Ruturaj Gaikwad) खास आहे.

मुंबई, 16 ऑक्टोबर :  चेन्नई सुपर किंग्सनं कोलकाता नाईट रायडर्सचा 27 रननं पराभव करत (IPL Final CSK vs KKR) चौथ्यांदा आयपीएल स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. चेन्नईचं हे विजेतेपद त्यांचा ओपनर ऋतुराज गायकवाडसाठी (Ruturaj Gaikwad) खास आहे. ऋतुराज हा  आयपीएलच्या इतिहासात सगळ्यात लहान वयात ऑरेंज कॅप (IPL Orange Cap) जिंकणारा खेळाडू ठरला आहे. फायनलआधी ऋतुराजला ऑरेंज कॅप केएल राहुलकडून (KL Rahul) घेण्यासाठी 24 रनची गरज होती. केकेआरचा कर्णधार इयन मॉर्गनने (Eoin Morgan) टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. यानंतर ओपनिंगला बॅटिंगला आलेल्या ऋतुराजने 27 बॉलमध्ये 32 रनची खेळी केली आणि केएल राहुलला मागे टाकून ऑरेंज कॅप पटकावली.

आयपीएलच्या या मोसमात ऋतुराजने 16 सामन्यांमध्ये 43.35 च्या सरासरीने आणि 136.26 च्या स्ट्राईक रेटने 635 रन केले. यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक रन करणाऱ्या खेळाडूंमध्ये दुसऱ्या क्रमांकावरही चेन्नई सुपर किंग्सचाच ओपनर फाफ डुप्लेसिस आहे. फाफने 16 इनिंगमध्ये 45.21 च्या सरासरीने आणि 138.20 च्या स्ट्राईक रेटने 633 रन केले.

ऋतुराजच्या या ऐतिहासिक कामगिरीनंतर फॅन्सना त्याची कथित गर्लफ्रेंड अभिनेत्री सायली संजीवची (Sayali Sanjeev) आठण झाली आहे. सायलीनं शुक्रवारी सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा देण्यासाठी सोशल मीडियावर पोस्ट टाकली होती. तिनं ही पोस्ट करताच अनेकांनी ऋतुराजच्या खेळाबद्दलची प्रतिक्रिया दिली आहे. 'तुम्ही UAE ला असता तर जोडीनं अवॉर्ड घेतलं असतं' अशी प्रतिक्रिया फॅन्सनं सायलीच्या वॉलवर व्यक्त केली असून ती चांगलीच व्हायरल झाली आहे.

ऋतुराजचं नाव मराठी अभिनेत्री सायली संजीवशी (Sayali Sanjeev) गेल्या काही महिन्यांपासून जोडलं जात आहे. सायलीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर नवे फोटो शेअर केल्यानंतर दोघांच्या रिलेशनीपबद्दल चर्चा सुरू झाली. सायलीच्या फोटोवर तिच्या चाहत्यांनी अनेक कमेंट्स तसेच लाइक्सही दिले आहे. पण यातील सगळ्यांचच लक्ष वेधून घेणारी कमेंट होती ती क्रिकेटर ऋतुराज गायकवाड याची. ऋतुराजने सायलीच्या फोटोवर "Woahh" अशी कमेंट केली आहे. त्यामुळे सायली आणि ऋतुराज या दोघांच्याही चाहत्यांमध्ये चर्चेला उधाण आलं आहे.

HBD Shardul Thakur: वाढदिवसाच्या आधीची रात्र ठरली बेस्ट! 2 बॉलमध्ये केलं CSK ला चॅम्पियन

सायलीबद्दल अफेयरच्या चर्चेनं जोर पकडताच ऋतुराजनं इन्स्टाग्रामवरुन स्पष्टीकरण दिले होते. 'माझी विकेट फक्त बॉलर घेऊ शकतो. ते देखील क्लीन बोल्ड. बाकी कुणी नाही.' असं ऋतुराजनं म्हटंल होतं. पण, शुक्रवारी ऋतुराजनं ऑरेंज कॅप मिळवताच पुन्हा एकदा या जोडीची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

First published:

Tags: Csk, IPL 2021, Sayali Sanjeev