• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IPL 2021 Final: KKR चा धोकादायक खेळाडू परतणार, CSK विरुद्ध आहे जबरदस्त रेकॉर्ड

IPL 2021 Final: KKR चा धोकादायक खेळाडू परतणार, CSK विरुद्ध आहे जबरदस्त रेकॉर्ड

आयपीएल स्पर्धेच्या फायनलमध्ये (IPL 2021 Final) 7 वर्षांनी प्रवेश केलेल्या कोलकाता नाईट रायडर्ससाठी (Kolkata Knight Riders) आनंदाची बातमी आहे.

 • Share this:
  मुंबई, 14 ऑक्टोबर : आयपीएल स्पर्धेच्या फायनलमध्ये (IPL 2021 Final) 7 वर्षांनी प्रवेश केलेल्या कोलकाता नाईट रायडर्ससाठी (Kolkata Knight Riders) आनंदाची बातमी आहे. केकेआरचा जखमी ऑल राऊंडर आंद्रे रसेल (Andre Russell) फायनलमध्ये खेळेल, असे संकेत आहेत. केकेआरचा मुख्य सल्लागार डेव्हिड हसी (David Hussey) याने याबाबतचं वक्तव्य केलं आहे. रसेला चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) विरुद्ध रेकॉर्ड चांगला आहे. त्यामुळे तो फायनलमध्ये परतला तर केकेआरची बाजू भक्कम होणार आहे. 'रसेल दिल्ली विरुद्धच्या मॅचपूर्वी बॉलिंग करत होता. तो फायनल खेळू शकतो.' असं हसीनं सांगितलं. रसेलचा चेन्नईविरुद्धचा रेकॉर्ड जबरदस्त आहे. त्यानं भारतामध्ये झालेल्या आयपीएल स्पर्धेच्या पहिल्या हाफमध्ये चेन्नईविरुद्ध 30 बॉलमध्ये 54 रनची खेळी खेळली होती. त्याशिवाय 2018 साली 36 बॉलमध्ये 88 आणि 2014 साली 25 बॉलमध्ये 58 रनची खेळी त्यानं खेळली आहे. केकेकेआरनं 136 रनचा पाठलाग करता सात विकेट्स गमावल्या. त्यांची मिडल ऑर्डर कोसळली. अखेर राहुल त्रिपाठीनं सिक्स लगावत टीमला एक बॉल राखत विजय मिळवून दिला. हसीनं या कामगिरीवर सांगितलं की, ' मी मिडल ऑर्डरच्या अपयशानं चिंतीत नाही. ते सर्व चांगले खेळाडू आहेत. त्यांना कसं खेळायचं हे माहिती नाही. आम्ही संपूर्ण आत्मविश्वासानं दुबईला जाणार आहोत. तिथं काय होईल, हे कुणी सांगू शकत नाही.' IPL 2021 Final: ...तर KKR चा विजय पक्का, 'हा' रेकॉर्ड पाहून धोनीची उडणार झोप! केकेआरच्या कामगिरीचं श्रेय हे इयन मॉर्गनला जातं. आम्हाला त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे. दिनेश कार्तिक आणि शाकीब अल हसन देखील पुढील मॅचमध्ये खेळणार आहे. ते त्यांच्या देशासाठी आणि आयपीएल टीमसाठी अनेकदा मॅचविनर ठरले आहेत. हेड कोच ब्रँडन मॅकलमसमोर टीम निवडीची डोकेदुखी असेल.'  असे हसीनं सांगितलं. IPL 2021 Final: आयपीएल फायनलमध्ये CSK चा रेकॉर्ड खराब, धोनीची टीम यंदा लकी ठरणार? हसीनं यावेळी केकेआरचा नवा खेळाडू व्यंकटेश अय्यरचीही प्रशंसा केली. 'आम्हाला व्यंकटेश अय्यरच्या रुपात चांगला खेळाडू मिळाला आहे. तो एक चांगला माणूस आणि 'टीम मॅन' आहे. त्यानं आणि शूभमन गिलनं चांगली पार्टनरशिप केली. दोघांमधील ताळमेळ देखील जबरदस्त होता.'
  Published by:News18 Desk
  First published: