मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

T20 World Cup: भारत-पाकिस्तान मॅचच्या तिकीटासाठी फॅन्सचं रोहित शर्माला साकडं, Photo Viral

T20 World Cup: भारत-पाकिस्तान मॅचच्या तिकीटासाठी फॅन्सचं रोहित शर्माला साकडं, Photo Viral

क्रिकेट फॅन्सला सर्वात जास्त प्रतीक्षा ही भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan T20 World Cup Match) या हाय व्होल्टेज मॅचची आहे. 24 ऑक्टोबर रोजी दुबईत ही मॅच होणार आहे.

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 9 ऑक्टोबर: आयपीएल स्पर्धा (IPL 2021) आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. लीग मॅचमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या 4 टीममध्ये आता विजेतेपदासाठी शेवटची लढाई (IPL 2021 Playoffs) होणार आहे. आयपीएलचा थरार शिगेला पोहचलेला असतानाच क्रिकेट फॅन्सना टी20 वर्ल्ड कपचे वेध लागले आहेत.  क्रिकेट फॅन्सला सर्वात जास्त प्रतीक्षा ही भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan T20 World Cup Match) या हाय व्होल्टेज मॅचची आहे. 24 ऑक्टोबर रोजी दुबईत ही मॅच होणार आहे. या वर्ल्ड कपच्या काळात स्टेडियममध्ये बसून मॅच पाहण्याची परवानगी देण्यात आली आहे. भारत-पाकिस्तान मॅचसाठी प्रेक्षक सर्वात जास्त उत्सुक आहेत. या स्पर्धेची तिकीटं काही क्षणांमध्येच संपली आहेत. काही तिकीटांची विक्री 333 पट अधिक दरानं झाली आहे. तर सर्वात महागडी तिकीटं 2 लाख रूपये मोजून घेऊन क्रिकेट फॅन्सनी खरेदी केली आहेत. अनेक क्रिकेट फॅन्स अजूनही या मॅचची तिकीटं मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. आयपीएलमध्ये शुक्रवारी झालेल्या मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (MI vs SRH) मॅचमध्ये एका फॅननं मुंबई इंडियन्सचा कॅप्टन रोहित शर्मालकडंच (Rohit Sharma) तिकीट मिळवून देण्यासाठी साकडं घातलं आहे. त्यानं एक पोस्टर तयार केलं होतं. त्यावर, 'रोहित भारत-पाकिस्तान मॅचची 2 तिकीटं प्लीज मिळवून दे', अशी मागणी करण्यात आली होती. हे पोस्टर सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. T20 World Cup: पाकिस्तान टीममध्ये 3 बदल, भारताची डोकेदुखी वाढणार? किती आहे किंमत? भारत पाकिस्तान मॅचच्या एका तिकीटाची सर्वात कमी किंमत 12,500 रुपये आहे. याशिवाय 31,200 आणि 54, 100 रुपयांचीही प्रीमियम आणि प्लॅटिनम स्टँडवरील तिकीच विक्रीसाठी होती. या तिन्ही गटातील तिकीटं विकली गेली आहेत. काही तिकटं तर चढ्या दरानं 2 लाख रुपये किंमतालाही विकली गेल्याचं वृत्त आहे.
First published:

Tags: India vs Pakistan, IPL 2021, T20 world cup

पुढील बातम्या