मुंबई, 13 सप्टेंबर : आयपीएल 2021 (IPL 2021) स्पर्धेतील दुसऱ्या टप्प्याच्या लढती 19 सप्टेंबरपासून यूएईमध्ये होणार आहेत. हा सिझन सुरु होण्यापूर्वी आयपीएल फ्रँचायझींसाठी काळजीची बातमी आहे. इंग्लंडचे 6 क्रिकेटपटू आजवर वेगवेगळ्या कारणामुळे वर्ल्ड कपमधून बाहेर पडले आहेत. आता उर्वरित 10 पैकी 9 खेळाडू देखील संपूर्ण स्पर्धा खेळणार नाहीत. मँचेस्टर टेस्ट रद्द झाल्यापासून (Manchester Test Cancelled) भारत आणि इंग्लंड या दोन देशांच्या क्रिकेट बोर्डाचे संबंध ताणले गेले आहेत.
'क्रिकबझ'नं दिलेल्या वृत्तानुसार इंग्लंडची टीम 14 आणि 15 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानमध्ये दोन टी20 सामने खेळणार आहे. त्यासाठी सर्व खेळाडूंना 9 ऑक्टोबरपर्यंत इंग्लंडमध्ये दाखल होण्याचे आदेश इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डानं (ECB) दिले आहेत. त्यामुळे इंग्लंडचे 9 खेळाडू आयपीएल प्ले ऑफ खेळण्यासाठी उपलब्ध नसतील. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा (RCB) जॉर्ज गार्टन हा एकच ब्रिटीश खेळाडू संपूर्ण आयपीएलसाठी उपलब्ध असेल. आयपीएलचे 'प्ले ऑफ' सामने 10 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. तर फायनल मॅच 15 ऑक्टोबरला होणार आहे.
इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या या निर्णयाचा चेन्नई सुपर किंग्सला (CSK) सर्वाधिक फटका बसणार आहे. त्यांचे सॅम करन आणि मोईन अली हे दोन प्रमुख ऑल राऊंडर निर्णायक टप्प्यात टीमला सोडून जाणार आहेत. दिल्ली कॅपिटल्सचा टॉम करन, कोलकाता नाईट रायडर्सचा कॅप्टन इयन मॉर्गन देखील लीग मॅचनंतर मायदेशी परतणार आहे.
T20 World Cup: 16 वर्षाच्या क्रिकेटपटूचा कहर, पहिल्याच मॅचमध्ये 4 खेळाडूंना केलं Mankading
इंग्लंडनं मॉर्गनच्या कॅप्टनसीमध्ये 2019 साली झालेल्या वन-डे वर्ल्ड कप स्पर्धेचं विजेतेपद पटकावले होते. आता या वर्ल्ड कपमध्येही त्यांना तशी अपेक्षा आहे. इंग्लंडची पहिली लढत 23 ऑक्टोबर रोजी वेस्ट इंडिज विरुद्ध होणार आहे. ही सातवी टी20 वर्ल्ड कप स्पर्धा असून इंग्लंडनं यापूर्वी 2010 साली या स्पर्धेचं विजेतेपद पटकावले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.