मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021, Eliminator: 'करो वा मरो' लढतीत RCB मध्ये होणार बदल, अशी असेल Playing 11

IPL 2021, Eliminator: 'करो वा मरो' लढतीत RCB मध्ये होणार बदल, अशी असेल Playing 11

आयपीएल स्पर्धेत सलग दुसऱ्या सिझनमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं (Royal Challengers Bangalore)  'प्ले ऑफ' मध्ये प्रवेश केला आहे. आता  त्यांची लढत कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) विरुद्ध होणार आहे.

आयपीएल स्पर्धेत सलग दुसऱ्या सिझनमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं (Royal Challengers Bangalore) 'प्ले ऑफ' मध्ये प्रवेश केला आहे. आता त्यांची लढत कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) विरुद्ध होणार आहे.

आयपीएल स्पर्धेत सलग दुसऱ्या सिझनमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं (Royal Challengers Bangalore) 'प्ले ऑफ' मध्ये प्रवेश केला आहे. आता त्यांची लढत कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) विरुद्ध होणार आहे.

  • Published by:  News18 Desk

शारजाह, 11 ऑक्टोबर: आयपीएल स्पर्धेत सलग दुसऱ्या सिझनमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं (Royal Challengers Bangalore)  'प्ले ऑफ' मध्ये प्रवेश केला आहे. मागील सिझनमध्ये क्वालिफायरमध्ये त्यांचा सनरायझर्स हैदराबादकडून (SRH) पराभव झाला होता. यंदा त्यांची लढत कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) विरुद्ध होणार आहे. शारजाह क्रिकेट ग्राऊंडवर होणारा हा सामना रंगतदार होण्याची शक्यता आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला आजवर एकदाहा आयपीएल स्पर्धेचं विजेतेपद मिळवता आलेलं नाही. आता एलिमेनेटरमधील मॅच जिंकून विजेतेपदासाठी एक पाऊल पुढे टाकण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. कोलकाता नाईट रायडर्स (KKR vs RCB) विरुद्धच्या मॅचमध्ये त्यांची प्लेईंग 11 कशी असेल ते पाहूया

ओपनर्स : विराट कोहलीनं या सिझनमध्ये काही चांगल्या खेळी केल्या आहेत. मात्र त्याला मोठा स्कोअर करण्यात अपयश आलं आहे. तर देवदत्त पडिक्कल सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध दुर्दैवानं रन आऊट झाला होता. त्या मॅचमध्ये त्यानं 41 रन काढण्यासाठी 52 बॉल घेतले. तर दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध तर देवदत्त शून्यावर आऊट झाला. या अपयशानंतरही आरसीबीच्या ओपनिंग जोडीमध्ये कोणताही बदल होणार नाही.

मिडल ऑर्डर : श्रीकर भरतनं दिल्ली विरुद्ध झालेल्या शेवटच्या मॅचमध्ये दमदार अर्धशतक झळकावले होते. त्यानं शेवटच्या बॉलवर सिक्स लगावत टीमला विजय मिळून दिला होता. त्यामुळे तो कोलकाता विरुद्धही तिसऱ्या क्रमांकावर खेळायला येण्याचूी शक्यता आहे. त्यानंतर येणारा ग्लेन मॅक्सवेल चांगल्याच फॉर्मात आहे. त्यानं या सिझनमध्ये आजवर सहा अर्धशतकं झळकावली आहेत. आरसीबीला एबी डिविलियर्सच्या फॉर्मची मात्र चिंता आहे. केकेआरविरुद्ध एबी मोठी खेळी करेल अशी विराटाला अपेक्षा आहे.

IPL 2021: 2 कारणांमुळे घेतला कॅप्टनसी सोडण्याचा निर्णय, विराटनं केला खुलासा

ऑलराऊंडर्स : डॅनियल ख्रिस्टीननं यूएईमधील स्लो पिचवर समाधानकारक कामगिरी केली आहे. त्यानं मागील दोन मॅचमध्ये तीन विकेट्स घेतल्या आहेत. विदेशी खेळाडू म्हणून आरसीबीला त्याच्याकडून आणखी अपेक्षा असेल. शाहबाज अहमदनंही चांगली कामगिरी केली आहे. त्यानंतर आरसीबीला पॉवर प्ले मध्ये विकेट घेण्यात येत असलेलं अपयश लक्षात घेऊन काईल जेमीसनचा टीममध्ये समावेश होण्याची शक्यता आहे. जेमीसनची उपयुक्त बॅटींग हा देखील त्याच्या निवडीसाठी मदत करणारा घटक आहे.

बॉलर्स : हर्षल पटेलनं या सिझनमध्ये सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. मोहम्मद सिराजनंही गेल्या काही मॅचमध्ये चांगली बॉलिंग केलीय. तर युजवेंद्र चहलही सध्या फॉर्मात आहे. त्यामुळे या तिन्ही बॉलर्सकडून विराटला केकेआरविरुद्धही विराटला मोठी अपेक्षा असेल.

'आज तुमचे हे चांगले खेळले'; ऋतुराजच्या खेळीमुळे सायली संजीववर चाहते भलतेच खूश

RCB ची संभाव्य Playing 11 : विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, केएस भरत, ग्लेन मॅक्सवेल, एबी डीविलियर्स, डॅन ख्रिस्टीन, शाहबाज अहमद, काईल जेमीसन, हर्षल पटेल, युजवेंद्र चहल आणि मोहम्मद सिराज

First published:

Tags: IPL 2021, KKR, RCB