मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021: धोनीच्या खास व्यक्तीमुळे मुंबईला मिळाला पोलार्ड, 11 वर्षांपूर्वीची आठवण पुन्हा ताजी

IPL 2021: धोनीच्या खास व्यक्तीमुळे मुंबईला मिळाला पोलार्ड, 11 वर्षांपूर्वीची आठवण पुन्हा ताजी

मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) कायरन पोलार्ड (Kieron Pollard) शिवाय विचार करणे ही अशक्य गोष्ट आहे. सीएसकेचा कॅप्टन महेंद्रसिंह धोनीच्या विश्वासू व्यक्तीमुळेच मुंबईला पोलार्ड मिळाला आहे.

    मुंबई, 2 मे: मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) कायरन पोलार्ड (Kieron Pollard) शिवाय विचार करणे ही अशक्य गोष्ट आहे. वेस्ट इंडिजचा हा ऑल राऊंडर मुंबईचा 2010 च्या आयपीएलपासून (IPL 2010) महत्त्वाचा सदस्य आहे. टीम अडचणीत असताना हमखास खेळण्याचा आणि मॅच जिंकून देण्याचा पोलार्डचा लौकिक आहे.  चेन्नई सुपर किंग्स (CSK) विरुद्ध शनिवारी झालेल्या मॅचमध्ये हे पुन्हा एकदा दिसलं. मुंबई इंडियन्सला या मॅचमध्ये विजयासाठी 219 रनची आवश्यकता होती. कायरन पोलार्डच्या (Kieron Pollard) वादळी खेळीमुळे मुंबईनं हे आव्हान 4 विकेट्स राखून पूर्ण केलं. मुंबईचा आयपीएल इतिहासातला हा सगळ्यात यशस्वी पाठलाग होता. पोलार्डने 34 बॉलमध्ये नाबाद 87 रनची खेळी केली, यामध्ये त्याने 6 फोर आणि 8 सिक्स मारले. तब्बल 255.88 च्या स्ट्राईक रेटने पोलार्डने बॅटिंग केली. चेन्नईविरुद्ध ही वादळी बॅटींग करणारा पोलार्ड हा महेंद्रसिंह धोनीचा सर्वात विश्वासू सहकारी असलेल्या ड्वेन ब्राव्होमुळे (Dwayne Bravo) मुंबईला मिळाला आहे. आयपीएल 2010 च्या पूर्वी ब्राव्हो मुंबई इंडियन्सचा सहकारी होता. त्यानंच मुंबईच्या मॅनेजमेंटला पोलार्डला टीममध्ये घेण्याचा आग्रह केला. मुंबई विरुद्ध चेन्नई मॅच झाल्यानंतर क्रिकेट समालोचक हर्षा भोगले (Harsha Bhogle) यांनी हा 'क्रिकबझ'शी बोलताना हा किस्सा सांगितला आहे. ब्राव्होनं पोलार्डला  घेण्यासाठी मुंबई इंडियन्सला भाग पाडलं. या खेळाडूमध्ये स्पेशल टॅलेंट आहे, तुम्ही त्याला कारबद्ध करा, अशी मोहीम ब्राव्होनं चालवली होती, असं भोगले यांनी सांगितलं. IPL 2021: मुंबई विरुद्ध पराभूत झाल्यानं शांत धोनीही संतापला, 'या' खेळाडूंवर ठेवला ठपका 2010 साली झालेल्या चॅम्पियन्स लीगमध्ये पोलार्डनं 197.29 च्या स्ट्राईक रेटनं रन काढले होते. त्याचा तो खेळ पाहून मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगुळुरु यांनी पोलार्डला घेण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. यामध्ये अखेर मुंबईनं बाजी मारली  'त्याच्या चॅम्पियन्स लीगमधील खेळीपूर्वीच मुंबई इंडियन्सनं पोलार्डला घेण्याचं नक्की केलं होतं,' अशी आठवण भोगले यांनी सांगितली आहे. आयपीएल 2010 नंतर ब्राव्हो चेन्नई सुपर किंग्सच्या टीममध्ये गेला. आजही तो त्या टीमचा सदस्य आहे. धोनीचा चेन्नई टीममधील सर्वात विश्वासू खेळाडू अशी ब्राव्होची ओळख आहे. पण 2010 साली मुंबई इंडियन्समध्ये असताना ब्राव्होनं दाखवलेल्या दूरदृष्टीमुळेच  मुंबईला पोलार्ड मिळाला. पोलार्डनं शनिवारी खेळलेल्या वादळी खेळीमुळे ही आठवण पुन्हा एकदा ताजी झाली आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Csk, IPL 2021, Kieron pollard, MS Dhoni, Mumbai Indians

    पुढील बातम्या