मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021: दिल्लीच्या पराभवानंतर पॉन्टिंगचं पंतकडं बोट, चुकांची जबाबदारी कॅप्टनवर ढकलली!

IPL 2021: दिल्लीच्या पराभवानंतर पॉन्टिंगचं पंतकडं बोट, चुकांची जबाबदारी कॅप्टनवर ढकलली!

चेन्नईला शेवटच्या ओव्हरमध्ये मॅच जिंकण्यासाठी 13 रनची आवश्यकता होती. महेंद्रसिंह धोनीनं (MS Dhoni) टॉम करनला (Tom Curran) 3 फोर लगावत या विजयावर शिक्कामोर्तब केले.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 11 ऑगस्ट: चेन्नई सुपर किंग्सनं (Chennai Super Kings) दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) 4 विकेट्सनं पराभव करत आयपीएल फायनलमध्ये (IPL 2021 Final) प्रवेश केला आहे. चेन्नईला शेवटच्या ओव्हरमध्ये मॅच जिंकण्यासाठी 13 रनची आवश्यकता होती. महेंद्रसिंह धोनीनं (MS Dhoni) टॉम करनला (Tom Curran) 3 फोर लगावत या विजयावर शिक्कामोर्तब केले. दिल्लीच्या पराभवानंतर शेवटची ओव्हर टॉम करनला देण्याच्या पंतच्या निर्णयावर प्रश्न विचारला जात आहे. त्यावेळी अनुभवी बॉलर कागिसो रबाडाची (Kagiso Rabada) एक ओव्हर शिल्लक होती.

दिल्ली कॅपिटल्सचा कोच रिकी पॉन्टिंग (Ricky Ponting) यानं या निर्णयापासून स्वत:ला वेगळं केलं आहे. रिकी पॉन्टिंगनं या विषयावर मॅचनंतर सांगितलं की, 'टॉम करनला शेवटची ओव्हर देण्याबाबतचा प्रश्न कॅप्टनला विचारला पाहिजे. या प्रकारचे निर्णय हे मैदानात घेतले जातात. कॅप्टनला तेव्हा काय वाटतं यावर हे अवलंबून असतं.' असं पॉन्टिंग म्हणाला.

टॉम करननं शेवटच्या ओव्हरपूर्वी तीन ओव्हर चांगली बॉलिंग केली होती. त्यानं शेवटच्या ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवरवरही मोईन अलीला (Moeen Ali) आऊट केले होते. तर रबाडाला मॅचमध्ये एकही विकेट मिळाली नव्हती. तरीही रबाडाचा अनुभव पाहता शेवटची ओव्हर त्याला द्यायला हवी होती, असं अनेक क्रिकेट तज्ज्ञांचं मत आहे.

CSK vs DC : ऋषभ पंतने केली घोडचूक, गुरूला 'गिफ्ट' दिली मॅच!

धोनीची केली प्रशंसा

रिकी पॉन्टिंगनं यावेळी धोनीची प्रशंसा केली. 'तो (धोनी) महान क्रिकेटपटूंपैकी एक आहे.  ऋतुराज गायकवाड आऊट झाल्यानंतर रविंद्र जडेजा येईल की महेंस धोनी येईल याचा आम्ही डगआऊटमध्ये बसून विचार करत होतो. त्यावेळी मी सांगितलं की धोनी आधी येईल आणि तो मॅच संपवण्याचा प्रयत्न करेल. तो जेव्हा क्रिकेट खेळणं बंद करेल यामधून पूर्ण निवृत्त होईल तेव्हा एक सर्वश्रेष्ठ फिनिशर म्हणून त्याची नेहमी आठवण काढली जाईल.

दुबईत दिसले माहीचे मॅजिक, धोनीनं विजय मिळवून देताच फॅन्स इमोशनल! Photos

धोनीच्या विरुद्ध दिल्लीचे बॉलर्स  रणनीतीनुसार बॉलिंग करण्यात अपयशी ठरले. आम्ही शेवटच्या दोन ओव्हर्समध्ये चांगली बॉलिंग करु शकलो नाही. तुमची धोनी समोर चूक झाली तर त्याचा तुम्हाला फटका बसणार,' हे पॉन्टिंगने मान्य केले.

First published:

Tags: Csk, Delhi capitals, IPL 2021