• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IPL 2021: दिल्ली कॅपिटल्सनं पूर्ण केली पृथ्वी शॉची 'ती' मागणी, Video Viral

IPL 2021: दिल्ली कॅपिटल्सनं पूर्ण केली पृथ्वी शॉची 'ती' मागणी, Video Viral

दिल्ली कॅपिटल्सची (Delhi Capitals) आयपीएल स्पर्धेतील दुसरी लढत राजस्थान रॉयल्सशी होत आहे. या मॅचपूर्वी दिल्लीच्या मॅनेजमेंटनं टीमचा ओपनिंग बॅट्समन पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याची मागणी पूर्ण केली आहे.

 • Share this:
  मुंबई, 15 एप्रिल : दिल्ली कॅपिटल्सची (Delhi Capitals) आयपीएल स्पर्धेतील दुसरी लढत राजस्थान रॉयल्सशी होत आहे. या मॅचपूर्वी दिल्लीच्या मॅनेजमेंटनं टीमचा ओपनिंग बॅट्समन पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याची मागणी पूर्ण केली आहे. दिल्लीचे कोच रिकी पॉन्टिंग (Ricky Ponting) यांच्या भाषणाचा एक व्हिडीओ दिल्लीनं त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन शेअर केला आहे. काही दिवसांपूर्वी पृथ्वीनं त्याबाबत वक्तव्य केलं होतं. पॉन्टिंगच्या भाषणाचा हा व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल (Viral) झाला आहे. पृथ्वी शॉ यानं पहिल्या मॅचमध्ये 38 बॉलमध्ये 72 रनची आक्रमक खेळी केली होती. त्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये रिकी पॉन्टिंग यांनी पृथ्वीची प्रशंसा केली होती. दिल्ली कॅपिटल्सनं पॉन्टिंगच्या भाषणाचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्या व्हिडीओत त्यांनी पृथ्वी शॉ याची एक मागणी पूर्ण केली आहे. काय होती मागणी? दिल्ली कॅपिटल्सनं पृथ्वीचा एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यामध्ये तो म्हणतो, " ''बॉस परत आले आहेत. ते एक चांगले व्यक्ती आहे. मैदानात ते बॉससारखे असतात. मैदानाच्या बाहेर एका मित्रासारखे वाटतात. मला वाटतं कि ते खूप चांगले व्यक्ती आहे. हे वर्ष कसं जातंय ते पाहूया. पृथ्वी पुढं म्हणाला," मला असं वाटतं कि जेव्हा रिकी सर बोलत असतील त्यावेळी बॅक ग्राऊंडमध्ये शाहरुख खानच्या 'चक दे' सिनेमाचं गाणं वाजलं पाहिजे.''दिल्ली कॅपिटल्सनं पृथ्वीची ही मागणी पूर्ण केली आहे. दिल्ली कॅपिटल्सनं पहिल्या मॅचमध्ये चेन्नई सुपर किंग्सचा सात विकेट्सनं पराभव केला होता. पृथ्वीच्या या मॅचमधील कामगिरीवर पॉन्टिंग म्हणाला, "पृथ्वी शॉ अद्भूत आहे. मात्र त्याला प्रत्येक इनिंगनंतर शिकण्याची गरज आहे. तुला पुढच्या इनिंगमध्ये मनात काहीही विचार न करता जायचं आहे. त्यानंतर तू जास्त रन करु शकशील." DC Vs RR: दोन नवखे कर्णधार आमने-सामने, कोरोनामुळे दिल्लीला मोठा फटका दिल्ली कॅपिटल्सची दुसरी मॅच राजस्थान रॉयल्सविरुद्ध गुरुवारी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. ही मॅच चांगल्या फरकानं जिंकून पॉईंट्स टेबलमध्ये टॉपवर जाण्याचा ऋषभ पंतच्या टीमचा प्रयत्न असेल.
  Published by:News18 Desk
  First published: