Home /News /sport /

IPL 2021 : दिल्लीच्या टीममधून ख्रिस वोक्सची माघार, 100 विकेट्स घेणाऱ्या बॉलरचा समावेश

IPL 2021 : दिल्लीच्या टीममधून ख्रिस वोक्सची माघार, 100 विकेट्स घेणाऱ्या बॉलरचा समावेश

आयपीएल स्पर्धेचा दुसरा टप्पा (IPL 2021 2nd Phase) सुरू होण्यास आता 6 दिवसांचाच अवधी शिल्लक आहे. त्याचवेळी टीममधील इंग्लिश ऑल राऊंडर ख्रिस वोक्सनं (Chris Woakes) वैयक्तिक कारणासाठी टीममधून माघार घेतली आहे.

    मुंबई, 13 सप्टेंबर : आयपीएल  स्पर्धेचा दुसरा टप्पा  (IPL 2021 2nd Phase)  सुरू होण्यास आता 6 दिवसांचाच अवधी शिल्लक आहे. त्याचवेळी पॉईंट टेबलमध्ये अव्वल असलेल्या दिल्ली कॅपिटल्सला (Delhi Capitals) धक्का बसला आहे. टीममधील इंग्लिश ऑल राऊंडर ख्रिस वोक्सनं (Chris Woakes) वैयक्तिक कारणासाठी टीममधून माघार घेतली आहे. आता दिल्लीनं वोक्सच्या जागी ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर बेन ड्वारिफियूसचा (Ben Dwarshuis) समावेश केला आहे. बेनला आजवर ऑस्ट्रेलियाकडून खेळण्याची संधी मिळालेली नाही. पण त्यानं बिग बॅश लीग स्पर्धेत चांगली बॉलिंग केली आहे. तो या स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या बॉलर्सच्या यादीमध्ये सहाव्या क्रमांकावर आहे. सिडनी सिक्सर्स टीमकडून खेळणाऱ्या बेननं आजवर 82 टी 20 मॅचमध्ये 100 विकेट्स घेतल्या आहेत. बेन लवकरच यूएईमध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या बायो-बबलमध्ये दाखल होणार आहे. त्याला यूएईमध्ये दाखल झाल्यानंतर 6 दिवस क्वारंटाईन राहायचे असल्यानं सुरुवातीच्या काही मॅच खेळता येणार नाहीत. दिल्लीनं या सिझनच्या पहिल्या टप्प्यात 8 पैकी 6 सामने जिंकले असून ही टीम पॉईंट टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. दिल्लीची पहिली लढत 25 सप्टेंबर रोजी राजस्थान रॉयल्सशी होणार आहे. IPL 2021: चेन्नईच्या अडचणीत भर, 4 खेळाडूंनी वाढवली धोनीची चिंता इंग्लंडच्या 6 खेळाडूंची माघार आयपीएल स्पर्धेतून माघार घेणारा ख्रिस वोक्स हा इंग्लंडचा सहावा खेळाडू आहे. जोफ्रा आर्चरनं दुखापतीमुळे, बेन स्टोक्सनं मानसिक कारणामुळे, जोस बटलरनं वडिल झाल्यानं तर अन्य तीन खेळाडूंनी वैयक्तिक कारणांमुळे स्पर्धेतून माघार घेतली आहे. तर स्पर्धा सुरु होण्यास एक आठवडा बाकी असताना जॉनी बेअरस्टो, डेव्हिड मलान आणि ख्रिस वोक्स या तिघांनीही वैयक्तिक कारणांमुळे आयपीएलचा दुसरा टप्पा खेळणार नसल्याचं जाहीर केलं आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news, Delhi capitals, IPL 2021

    पुढील बातम्या