IPL 2021: पुन्हा चहरचा कहर! पंजाबनंतर कोलकाताला दाखवला हिसका

IPL 2021: पुन्हा चहरचा कहर! पंजाबनंतर कोलकाताला दाखवला हिसका

कोलकाता नाईट रायडर्स (KKR) विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (CSK) यांच्यातील सामन्या पुन्हा एकदा दीपक चहरचा (Deepak Chahar) कहर पाहयला मिळाला.

  • Share this:

मुंबई, 21 एप्रिल:  कोलकाता नाईट रायडर्स  (KKR) विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (CSK) यांच्यातील सामन्या पुन्हा एकदा दीपक चहरचा (Deepak Chahar) कहर पाहयला मिळाला. चेन्नई सुपर किंग्सकडून खेळणाऱ्या या फास्ट बॉलरनं 29 रन देत 4 विकेट्स घेतल्या. यापूर्वी पंजाब किंग्ज (Punjab Kings) विरुद्धही चहरनं 13 रन देत 4 विकेट्स घेतल्या होत्या.

दीपक चहरनं पहिल्याच ओव्हरमध्ये शुभमन गिलला आऊट करत केकेआरला पहिला धक्का दिला. गिल शून्यावर आऊट झाला. त्यानंतर चहरनं नितीश राणाला 9 रनवर आऊट केलं. केकेआरचा कॅप्टन इयन मॉर्गन पुन्हा एकदा अपयशी ठरला. त्याला चहरनं 7 रनवर परत पाठवलं. त्याच ओव्हरमध्ये चहरनं सुनील नरीन (4) रनवर आऊट करत कोलकाताला चौथा धक्का दिला. चहरच्या या खतरनाक स्पेलमुळे 5 ओव्हरनंतर कोलकाताची अवस्था 4 आऊट 31 झाली होती.

चहरनं यापूर्वी पंजाब किंग्ज विरुद्धही खतरनाक स्पेल टाकला होता. त्याने 4 ओव्हरमध्ये अवघ्या 13 धावा देत, चार खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला. चहरने मयांक अग्रवाल (0), क्रिस गेल (10), निकोलस पूरन (0) आणि दीपक हुडा (10) यांना स्वस्तात बाद केलं आहे. दीपक चहरची हा आयपीएलमधील सर्वोत्कृष्ट कामगिरी ठरली.  या सामान्यात चहरने एक मेडन ओव्हर देखील टाकली आहे.

बुधवारच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सनं पहिल्यांदा बॅटींग करत कोलकाता समोर 221 रनचं टार्गेट ठेवलं. चेन्नईकडून फाफ ड्यू प्लेसिसनं (Faf du Plessis) सर्वात जास्त नाबाद 95 रन काढले. 60 बॉलमध्ये 9 फोर आणि 4 सिक्सच्या मदतीनं त्यानं ही खेळी केली.

IPL 2021: शाहरुखच्या टीम विरुद्ध पुणेकर हिरो! धोनीचा विश्वास ठरवला सार्थ

ऋतुराज गायकवाड (Rutruraj Gaikwad) याने आक्रमक 64 रन करत सीएसकेला दमदार सुरुवात करुन दिली.  त्यानं 33 बॉलमध्येच 5 फोर आणि 3 सिक्सच्या मदतीनं या सिझनमधील पहिलं अर्धशतक पूर्ण केलं.  तो अखेर 42 बॉलमध्ये 64 रन काढून आऊट झाला. चौथ्या क्रमांकावर बॅटींगला आलेल्या महेंद्रसिंह धोनीनं 8 बॉलमध्ये 17 रन काढले. तर रवींद्र जडेजा 6 रन काढून नाबाद राहिला.

Published by: News18 Desk
First published: April 21, 2021, 10:52 PM IST

ताज्या बातम्या