मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021: दिल्लीच्या पराभवानं इमोशनल झालेल्या पंतला कोहलीनं दिला धीर, पाहा VIDEO

IPL 2021: दिल्लीच्या पराभवानं इमोशनल झालेल्या पंतला कोहलीनं दिला धीर, पाहा VIDEO

मोहम्मद सिराजनं (Mohammed Siraj)  टाकलेल्या शेवटच्या बॉलवर दिल्लीला विजयासाठी 6 रन हवे होते. ऋषभ पंतला सिक्स मारण्यात अपयश आलं. या निसटत्या पराभवामुळे पंत इमोशनल झाला होता.

मोहम्मद सिराजनं (Mohammed Siraj) टाकलेल्या शेवटच्या बॉलवर दिल्लीला विजयासाठी 6 रन हवे होते. ऋषभ पंतला सिक्स मारण्यात अपयश आलं. या निसटत्या पराभवामुळे पंत इमोशनल झाला होता.

मोहम्मद सिराजनं (Mohammed Siraj) टाकलेल्या शेवटच्या बॉलवर दिल्लीला विजयासाठी 6 रन हवे होते. ऋषभ पंतला सिक्स मारण्यात अपयश आलं. या निसटत्या पराभवामुळे पंत इमोशनल झाला होता.

  • Published by:  News18 Desk

अहमदाबाद, 28 एप्रिल : आयपीएल स्पर्धेत मंगळवारी झालेल्या मॅचमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं (RCB) दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) अवघ्या एक रननं पराभव केला. दिल्लीचा कॅप्टन ऋषभ पंत (Rishah Pant) आणि  शिमरन हेटमायर (Shimron Hetmyer) यांनी पाचव्या विकेट्ससाठी 78 रनची नाबाद पार्टनरशिप केली. मात्र त्यांची ही पार्टनरशिप दिल्लीला विजय मिळवून देऊ शकली नाही.

मोहम्मद सिराजनं (Mohammed Siraj) टाकलेल्या शेवटच्या बॉलवर  दिल्लीला विजयासाठी 6 रन हवे होते. ऋषभ पंतला सिक्स मारण्यात अपयश आलं. त्यानं फोर लगावला. त्यामुळे दिल्लीची टीम एक रननं पराभूत झाली. या निसटत्या पराभवाची निराशा पंत आणि हेटमायर यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती.  हेटमायर निराश होऊन खाली बसला. तर ऋषभ पंतही इमोशनल झाला होता.

मॅच संपल्यानंतर पद्धतीप्रमाणे विराट कोहली प्रतिस्पर्धी टीमच्या खेळडूंशी हस्तांदोलन करण्यासाठी पुढे आला. त्यावेळी त्यानं पंतच्या डोक्यावर हात ठेवून त्याचं सांत्वन केलं. तसेच इमोशनल झालेल्या पंतला बोलून धीर दिला. विराट कोहलीनं या कृतीनं क्रिकेट फॅन्सचं मन जिंकलं आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

दिल्लीविरुद्धच्या या विजयासह बँगलोर पॉईंट्स टेबलमध्येही पहिल्या क्रमांकावर गेली आहे. विराटच्या टीमने 6 पैकी 5 सामन्यांमध्ये विजय मिळवला असून एका सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे, तर दुसरीकडे दिल्लीची टीम 6 सामन्यात 4 विजय आणि 2 पराभवांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

What. A. Match!@RCBTweets prevail by 1 run. With 6 needed off the final ball, Pant hits a boundary but @DelhiCapitals fall short by a whisker. Siraj does well under pressure.

Hetmyer and Pant are distraught. https://t.co/NQ9SSSBbVT #DCvRCB #VIVOIPL pic.twitter.com/ju87soRG6B

— IndianPremierLeague (@IPL) April 27, 2021

त्यापूर्वी एबी डिव्हिलियर्सच्या (AB De Villiers) एकाकी झुंजार खेळीनंतर बंगळुरुनं दिल्लीला (RCB vs DC) विजयासाठी 172 रनचं आव्हान दिलं होतं. बंगळुरुकडून डीव्हिलियर्सनं सर्वात जास्त रन केले. त्यानं फक्त  42 बॉलमध्ये नाबाद 75 रन केले, त्याच्या या खेळीमध्ये 5 सिक्स आणि 3 फोरचा समावेश होता.

(वाचा : विराटच्या मदतीला रोहित धावला, मुंबईने RCB ला हा खेळाडू उधारीवर दिला )

दिल्ली कॅपिटल्सची पुढील मॅच गुरुवारी कोलकाता नाईट रायडर्सशी (KKR) होणार आहे. तर रॉयल चँलेजर्सची पुढील मॅच पंजाब किंग्ज (PBKS) विरुद्ध शुक्रवारी आहे.

First published:

Tags: Delhi capitals, IPL 2021, RCB, Rishabh pant, Video viral, Virat kohli