मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021: ऋषभ पंतच्या बाबतीत घडला मजेशीर प्रसंग, VIDEO पाहून आवरणार नाही हसू

IPL 2021: ऋषभ पंतच्या बाबतीत घडला मजेशीर प्रसंग, VIDEO पाहून आवरणार नाही हसू

दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) कॅप्टन ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) बाबतीत एक मजेशीर प्रसंग घडला. या प्रसंगाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral) झाला आहे.

  • Published by:  News18 Desk
अहमदाबाद, 3 मे: दिल्ली कॅपिटल्सनं (Delhi Capitals) रविवारी झालेल्या मॅचमध्ये पंजाब किंग्जचा (Punjab Kings) 7 विकेट्सनं पराभव केला. या विजयानंतर दिल्लीची टीम पॉईंट टेबलमध्ये नंबर 1 वर पोहचली आहे. दिल्लीच्या या एकतर्फी विजयात त्यांचा कॅप्टन ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) बाबतीत एक मजेशीर प्रसंग घडला.  या प्रसंगाचा  व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral) झाला आहे. काय घडला प्रसंग? दिल्लीची बॅटींग सुरु असताना 17 व्या ओव्हरमध्ये हा प्रसंग घडला. पंजाबच्या ख्रिस जॉर्डननं (Chris Jordan) टाकलेल्या बॉलवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पंतनं केला. यावेळी पंतनं बॅट तर जोरात फिरवली, पण त्याचवेळी त्याच्या हातातून बॅट निसटली. बॉल एका बाजूला गेला. तर बॅट दुसऱ्या बाजूला उंच उडाली. ऋषभ पंतचा शॉट मारताना अंदाज चुकल्यानं त्याची बॅट हातातून निसटली. त्याचवेळी त्या बॉलवर सिक्स मारण्याचा पंतचा प्रयत्न देखील यशस्वी झाला नाही. पंजाबचा कॅप्टन मयंक अगरवाल (Mayank Agarwal) यानं पंतचा कॅच घेतला. पंतनं आऊट होण्यापूर्वी 11 बॉलमध्ये 1 फोर आणि 1 सिक्सच्या मदतीनं 14 रन काढले होते. पंत परत जाताना पंजाबच्या फिल्डरनं त्याला बॅट आणून दिली. IPL 2021: SRH च्या निर्णयावर डेव्हिड वॉर्नरचा भाऊ नाराज, सांगितलं खरं कारण पंजाबने दिलेले 167 रनचं आव्हान दिल्लीने 17.4 ओव्हरमध्येच 3 विकेट गमावून पूर्ण केलं. शिखर धवनने (Shikhar Dhawan) 47 बॉलमध्ये नाबाद 69 रन केले, तर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) 22 बॉलमध्ये 39 रन करून आऊट झाला. स्मिथने 24, ऋषभ पंतने 14 आणि शिमरन हेटमायरने नाबाद 16 रनची खेळी केली. पंजाबकडून रिले मेरेडिथ, क्रिस जॉर्डन आणि हरप्रीत ब्रार यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली.
First published:

Tags: Delhi capitals, IPL 2021, Punjab kings, Rishabh pant

पुढील बातम्या