मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021: डीव्हिलियर्सचा कमी बॉलमध्ये मोठा रेकॉर्ड! विराट, रोहितला टाकलं मागं

IPL 2021: डीव्हिलियर्सचा कमी बॉलमध्ये मोठा रेकॉर्ड! विराट, रोहितला टाकलं मागं

एबी डीव्हिलियर्सला (AB de Villiers) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या बॅटींगचा मुख्य आधारस्तंभ मानलं जातं. दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) विरुद्धच्या मॅचमध्ये त्यानं एक मोठा रेकॉर्ड केला आहे.

  • Published by:  News18 Desk

अहमदाबाद, 28 एप्रिल: एबी डीव्हिलियर्सला (AB de Villiers) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या बॅटींगचा मुख्य आधारस्तंभ मानलं जातं. दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) विरुद्धच्या मॅचमध्येही डीव्हिलियर्सनं जोरदार फटकेबाजी केली. त्यानं फक्त 42 बॉलमध्ये नाबाद 75 रन काढले. यामध्ये 3 फोर आणि 5 सिक्सचा समावेश आहे. या आक्रमक खेळीमुळे त्याला 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कारानं गौरवण्यात आलं. डीव्हिलियर्सचा आयपीएल स्पर्धेतील 25 वा 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार आहे.

आरसीबीच्या विजयासोबतच मंगळवारी झालेली मॅच डीव्हिलियर्ससाठी आणखी एका कारणामुळे खास ठरली. त्यानं आयपीएल स्पर्धेत 5 हजार रन पूर्ण केले आहेत. त्यानं ही कामगिरी केवळ 3288 बॉलमध्ये आणि 152.70 च्या स्ट्राईक रेटनं पूर्ण केले आहेत. यामध्ये 3 शतक आणि 40 अर्धशतकांचा समावेश आहे.

डीव्हिलियर्सनं 5 हजार रनचा टप्पा सर्वात कमी बॉलमध्ये पूर्ण केला आहे. यापूर्वी हा रेकॉर्ड सनरायझर्स हैदराबादचा (SRH) कॅप्टन डेव्हिड वॉर्नरच्या (David Warner) नावावर होता. वॉर्नरनं 3555 बॉलमध्ये 5 हजार रन केले होते. डीव्हिलियर्सनं वॉर्नरसह विराट कोहली (Virat Kohli), रोहित शर्मा (Rohit Sharma), सुरेश रैना (Suresh Raina) या दिग्गजांना मागं टाकलं आहे.

पहिल्यांदाच घडलेल्या 'या'घटनेमुळे फरक पडला, कोहलीनं सांगितलं RCB च्या विजयाचं कारण

दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या मॅचनंतर डीव्हिलियर्सचे आयपीएलमध्ये 5053 रन झाले आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या माजी कॅप्टननं आयपीएलची सुरुवात दिल्लीकडून केली होती. तो दिल्लीकडून पहिले 3 सिझन खेळला होता. दिल्लीकडून त्यानं 28 मॅचमध्ये 671 रन केले. तर आरसीबीकडून 4 हजार 382 रन केले आहेत. आयपीएलमध्ये 5 हजार रन करणारा डीव्हिलियर्स हा डेव्हिड वॉर्नर नंतरचा दुसरा खेळाडू आहे. आयपीएलमध्ये सर्वात जास्त रन करण्याचा रेकॉर्ड आरसीबीचा कॅप्टन विराट कोहलीच्या नावावर आहे. तो या लीगमध्ये 6 हजार रन करणारा एकमेव बॅट्समन आहे.

First published:

Tags: Cricket, Record, Rohit sharma, Sports, Virat kohli, World record