मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021: टीममधून काढल्यानंतर डेव्हिड वॉर्नर रडला! Photo पाहून हळहळले फॅन्स

IPL 2021: टीममधून काढल्यानंतर डेव्हिड वॉर्नर रडला! Photo पाहून हळहळले फॅन्स

राजस्थान रॉयल्स (RR) विरुद्धच्या मॅचच्या दरम्यान डेव्हिड वॉर्नर (David Warner) टीमच्या डगआऊटमध्ये बसला होता. त्या दरम्यानचा हा फोटो आहे

राजस्थान रॉयल्स (RR) विरुद्धच्या मॅचच्या दरम्यान डेव्हिड वॉर्नर (David Warner) टीमच्या डगआऊटमध्ये बसला होता. त्या दरम्यानचा हा फोटो आहे

राजस्थान रॉयल्स (RR) विरुद्धच्या मॅचच्या दरम्यान डेव्हिड वॉर्नर (David Warner) टीमच्या डगआऊटमध्ये बसला होता. त्या दरम्यानचा हा फोटो आहे

  • Published by:  News18 Desk
नवी दिल्ली, 3 मे : सनरायझर्स हैदराबादनं (SRH) राजस्थान रॉयल्स विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये त्यांचा सर्वात यशस्वी खेळाडू डेव्हिड वॉर्नर (David Warner) याला बाहेर बसवले होते. वॉर्नरनं 2014 साली हैदराबादकडून आयपीएलमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर पहिल्यांदाच त्याच्यावर टीमच्या बाहेर बसण्याची वेळ आली. आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी बॅट्समनपैकी एक असलेल्या वॉर्नरची हकालपट्टी अनेक क्रिकेट फॅन्सना आवडलेली नाही. त्यातच राजस्थान विरुद्धच्या मॅचच्या दरम्यान वॉर्नरचा व्हारल (Viral) झालेला एक फोटो पाहून क्रिकेट फॅन्स चांगलेच हळहळले आहेत. राजस्थान रॉयल्स (RR) विरुद्धच्या मॅचच्या दरम्यान डेव्हिड वॉर्नर टीमच्या डगआऊटमध्ये बसला होता. त्या दरम्यानचा हा फोटो आहे. या फोटोमध्ये वॉर्नर मान खाली घालून निराश अवस्थेमध्ये दिसत आहे. हैदराबाद टीमचा सहकारी त्याची समजूत घालत आहे. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालाय. वॉर्नरला टीमच्या बाहेर बसवणाऱ्या हैदराबादच्या निर्णयावर क्रिकेट फॅन्सनी नाराजी व्यक्त केलीय. हैदराबाद पुन्हा पराभूत हैदराबादच्या टीमनं त्यांच्या निराशाजनक कामगिरीचं खापर डेव्हिड वॉर्नरवर फोडलं. त्याच्या ऐवजी केन विल्यमसनकडे (Kane Williamson) नेतृत्व दिलं, पण कर्णधार बदलल्यानंतरही हैदराबादसमोरच्या अडचणी काही कमी झालेल्या नाहीत. राजस्थानविरुद्धच्या सामन्यात हैदराबादचा (SRH vs RR) 55 रननी पराभव झाला आहे. राजस्थानने दिलेलं 221 रनचं आव्हान पार करण्यासाठी आलेल्या हैदराबादला 20 ओव्हरमध्ये 165 रन करता आले. हैदराबादच्या एकाही बॅट्समनला अर्धशतकही करता आलं नाही. मनिष पांडेने (Manish Pandey) सर्वाधिक 31 रन केले. IPL 2021: 8 वर्षांमध्ये पहिल्यांदाच डेव्हिड वॉर्नरवर 'ही' नामुश्की का आली? या मॅचनंतर पॉईंट्स टेबलमध्ये राजस्थानची टीम पाचव्या क्रमांकावर पोहोचली आहे, तर हैदराबाद शेवटच्या स्थानावर आहे. राजस्थानने 7 पैकी 3 सामने जिंकले असून 4 सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला, तर हैदराबादला या मोसमात 7 पैकी फक्त 1 मॅच जिंकता आली आहे.
First published:

Tags: David warner, IPL 2021, Photo viral, SRH

पुढील बातम्या