• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IPL 2021: SRH च्या निर्णयावर डेव्हिड वॉर्नरचा भाऊ नाराज, सांगितलं खरं कारण

IPL 2021: SRH च्या निर्णयावर डेव्हिड वॉर्नरचा भाऊ नाराज, सांगितलं खरं कारण

राजस्थान विरुद्धच्या मॅचच्या दरम्यान डेव्हिड वॉर्नरला (David Warner) टीममधून वगळण्यात आलं. हैदराबादच्या या निर्णयावर वॉर्नरचा भाऊ स्टीव्ह वॉर्नर (Steve Warner) यानं टीका केली आहे. त्याचबरोबर टीमच्या निराशाजनक कामगिरीचं खरं कारण देखील सांगितलं आहे.

 • Share this:
  मुंबई, 3 मे : सनरायझर्स हैदराबादची (SRH) या सिझनमधील निराशाजनक कामगिरी सुरुच आहे. राजस्थान रॉयल्सनं (RR) रविवारी त्यांचा 55 रननं पराभव केला. हैदराबादनं 7 पैकी 6 सामने गमावले असून आता ही स्पर्धेतून (IPL 2021) लवकर आऊट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राजस्थान विरुद्धच्या मॅचपूर्वी हैदराबादनं त्यांचा कॅप्टन बदलला. डेव्हिड वॉर्नर (David Warner) याच्या जागी केन विल्यमसनकडं (Kane Williamson) नेतृत्व दिलं. त्याचबरोबर वॉर्नरला प्लेईंग 11 मधूनही बाहेर काढलं. राजस्थान विरुद्धच्या मॅचच्या दरम्यान वॉर्नर डग आऊटमध्ये होता. हैदराबादच्या या निर्णयावर डेव्हिड वॉर्नरचा भाऊ स्टीव्ह वॉर्नर (Steve Warner) यानं टीका केली आहे. त्याचबरोबर टीमच्या निराशाजनक कामगिरीचं खरं कारण देखील सांगितलं आहे. स्टीव्ह वॉर्नरनं त्याच्या एका पोस्टमध्ये हैदराबादच्या टीमला टॅग केलं आहे. यामध्ये त्यानं वॉर्नरची 2014 पासूनची आयपीएलमधील आकडेवारी शेअर केलीय. तसंच ओपनर्सची खराब कामगिरी हा टीमच्या निराशाजनक कामगिरीचं कारण नसल्याचा दावा केला आहे. मागच्या वर्षी युएईमध्ये झालेल्या आयपीएलमध्येही मिडल ऑर्डर हा मुख्य मुद्दा होता. यावर्षी देखील यामध्ये काहीही बदल झाला नाही. हैदराबादच्या ओपनिंग बॅट्समननं नाही तर मिडल ऑर्डरनं रन काढले पाहिजेत, असं स्टीव्हनं व्यक्त केलं आहे. स्टीव्ह वॉर्नरनं या पोस्टमध्ये म्हंटलं आहे की. "एक व्यक्ती ज्यानं इतके वर्ष तुमच्या टीमला सांभाळलं. ओपनिंग ही तुमच्या समस्येचं कारण नाही. तुम्ही एक मिडल ऑर्डर तयार करा, जी रन काढेल.' IPL 2021: 'आता त्याची बोलती बंद करणार' शतकानंतर माजी कॅप्टनबद्दल बटलरची प्रतिक्रिया! वॉर्नरवर नामुश्की का आली? सनरायझर्स हैदरबादच्या खराब कामगिरीचं खापर कॅप्टन म्हणून सर्वात प्रथम वॉर्नरच्या डोक्यावर फुटलं. या सिझनमध्ये हैदराबादची सुरुवात खराब झाली. त्यांचा पहिल्या 3 मॅचमध्ये सलग पराभव झाला. तसंच पहिल्या 6 पैकी फक्त 1 मॅचमध्ये त्यांचा विजय झाला आहे. वॉर्नरनं या काळात बॅट्समन म्हणूनही फार कमाल केली नाही. 6 मॅचमध्ये त्यानं 2 अर्धशतकासह 193 रन केले. त्याचा स्ट्राईक रेट हा फक्त 110.18 इतका होता. एक आक्रमक बॅट्समन आणि मॅच जिंकून देणारा कॅप्टन या दोन्ही बाबतीमध्ये वॉर्नर फेल गेल्यानंच त्याच्यावर 8 वर्षांमध्ये पहिल्यांदाच टीमच्या बाहेर बसण्याची वेळ आली आहे.
  Published by:News18 Desk
  First published: