Home /News /sport /

IPL 2021, RCB vs CSK : मॅच हरल्यानंतर विराटनं धोनीजवळ जाऊन केलं असं काही...VIDEO VIRAL

IPL 2021, RCB vs CSK : मॅच हरल्यानंतर विराटनं धोनीजवळ जाऊन केलं असं काही...VIDEO VIRAL

धोनी आणि कोहली ( MS Dhoni and Virat Kohli) या दोन्ही कॅप्टननी मैदानात आपली टीम विजयी व्हावी म्हणून जोरदार प्रयत्न केले. एकमेकांच्या विरुद्ध डावपेच वापरले. पण, मॅच संपल्यानंतर या दोन दिग्गज खेळाडूंमधील मैत्री पुन्हा एकदा जगासमोर आली आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 25 सप्टेंबर :  आयपीएल स्पर्धेत (IPL 2021) शुक्रवारी टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) आणि टी20 वर्ल्ड कपसाठीचा मेंटॉर महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) यांच्या टीम एकमेकांच्या विरुद्ध होत्या. बंगळुरु विरुद्ध चेन्नई (RCB vs CSK) यांच्यात झालेल्या या लढतीत विराट कोहलीनं आरसीबीला दमदार सुरूवात करुन दिली होती. विराट आणि देवदत्त पडिक्कल ही जोडी मैदानात असताना आरसीबीचं पारडं जड होतं. पण त्यानंतर धोनीनं बॉलर्सचा योग्य वापर करत आरसीबीला मोठा स्कोअर करण्यापासून रोखलं आणि नंतर मॅचही जिंकली. धोनी आणि कोहली या दोन्ही कॅप्टननी मैदानात आपली टीम विजयी व्हावी म्हणून जोरदार प्रयत्न केले. एकमेकांच्या विरुद्ध डावपेच वापरले. पण, मॅच संपल्यानंतर भारतीय क्रिकेटमधील या दोन दिग्गज खेळाडूंमधील मैत्री पुन्हा एकदा जगासमोर आली आहे. त्यांच्यातील बॉन्डिंगचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओनुसार धोनी मॅचनंतर चेन्नई सुपर किंग्सच्या (CSK) काही खेळाडूंशी चर्चा करत होता. त्यावेळी विराट पाठिमागून आला आणि त्यानं धोनीला उचललं. या दोघांमधील बॉन्डिंगची क्रिकेट फॅन्स प्रशंसा करत आहेत. आयपीएल स्पर्धेच्या पूर्वीच आगामी टी 20 वर्ल्ड कपसाठी महेंद्रसिंह धोनीची टीम इंडियाचा मेंटॉर म्हणून निवड करण्यात आली आहे. या मॅचपूर्वीही विराट आणि धोनीमध्ये मैदानात बराच काळ चर्चा सुरू होती. IPL 2021: CSK च्या 'या' खेळाडूशी धोनीचं दरवर्षी होतं भांडण, माहीनं स्वत: सांगितलं वादाचं कारण धोनीच्या अनुभवाचा होणार फायदा महेंद्रसिंह धोनी हा आयसीसी स्पर्धेत टीम इंडियाचा सर्वात  यशस्वी कॅप्टन आहे. 2007 टी-20 वर्ल्ड कप, 2011 वर्ल्ड कप आणि 2013 चॅम्पियन्स ट्रॉफी भारताने धोनीच्याच नेतृत्वात जिंकली. त्याच्या या अनुभवाचा टीम इंडियाला आगामी टी20 वर्ल्ड कप स्पर्धेत फायदा होणार आहे. आयपीएल स्पर्धा संपल्यानंतर लगेच 17 ऑक्टोबरपासून यूएई आणि ओमानमध्ये टी20 वर्ल्ड कप सुरू होणार आहे. या स्पर्धेत भारताची पहिली मॅच 24 ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध होणार आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: IPL 2021, MS Dhoni, Virat kohli

    पुढील बातम्या