IPL 2021: पंजाबला हरवल्यानंतर धोनी म्हणाला, 'मला म्हातारा झाल्यासारखं वाटतंय', पाहा VIDEO

IPL 2021: पंजाबला हरवल्यानंतर धोनी म्हणाला, 'मला म्हातारा झाल्यासारखं वाटतंय', पाहा VIDEO

चेन्नई सुपर किंग्सनं (CSK) शुक्रवारी झालेल्या सामन्यात पंजाब किंग्ज (PBKS) 6 विकेट्सनं पराभव केला. या विजयानंतर बोलताना, 'मला म्हातारा झाल्यासारखं वाटतंय', अशी प्रतिक्रिया महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) यानं दिली आहे.

  • Share this:

मुंबई, 17 एप्रिल : महेंद्रसिंह धोनीसाठी (MS Dhoni) शुक्रवारची मॅच खास होती. धोनीचा चेन्नई सुपर किंग्ससाठी (CSK) हा 200 वा सामना होता. आयपीएल (IPL) इतिहासात एका टीमकडून 200 मॅच खेळण्याचा विक्रम धोनीच्या नावावर झाला आहे. धोनी 2008 साली म्हणजेच पहिल्या आयपीएल सिझनमध्ये सीएसकेचा कॅप्टन झाला. आजही तोच या टीमचा कॅप्टन आहे. धोनीसाठी खास असलेल्या या सामन्यात सीएसकेनं पंजाब किंग्ज (PBKS) 6 विकेट्सनं पराभव करत धोनीला खास भेट दिली आहे.

107 रनचं आव्हान चेन्नईने 4 विकेट आणि 26 बॉल राखून पूर्ण केलं. मोईन अलीने (Moeen Ali) सर्वाधिक 46 रन, तर फाफ डुप्लेसिसने (Faf Duplesis) नाबाद 33 रन केले. पंजाबकडून मोहम्मद शमीने (Mohammad Shami) 2 विकेट घेतल्या, तर अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) आणि मुरुगन अश्विनला (Murugan Ashwin) 1-1 विकेट घेण्यात यश आलं.

त्यापूर्वी दीपक चहरच्या (Deepak Chahar) भेदक बॉलिंगमुळे पंजाबच्या बॅटींगची दाणादाण उडाली. चहरनं फक्त 13 रन देत 4 विकेट्स घेतल्या. चहरच्या घातक स्पेलनंतर पंजाबची टीम सावरलीच नाही. त्यांना निर्धारित 20 ओव्हरमध्ये 8 आऊट 106 रन करता आले. पंजाबकडून शाहरुख खाननं सर्वात जास्त 47 रन केले.

200 व्या मॅचमध्ये मिळालेल्या या विजयाबद्दल महेंद्रसिंह धोनी आनंदी होता. त्यानं या मॅचनंतर बोलताना त्याची आजवरचा आयपीएल प्रवासाचा पट उलगडून दाखवला.  "मला म्हातारा झाल्यासारखं वाटतंय. हा खूप लांबचा प्रवास होता. या प्रवासाला 2008 साली सुरुवात झाली. आम्ही भारत, दक्षिण आफ्रिका आणि युएईमध्ये खेळलो. आता पुन्हा भारतामध्ये परतलो आहोत.  या सिझनमध्ये मुंबई हे आमचं होम ग्राऊंड असेल, याचा कधी विचार केला नव्हता." असं धोनीनं सांगितलं.

View this post on Instagram

A post shared by IPL (@iplt20)

पंजाब किंग्ज विरुद्ध मिळवलेल्या विजयानंतर सीएसकेनं पॉईंट टेबलवर दुसऱ्या क्रमांकावर झेप मारली आहे. आता सीएसकेची पुढील लढत 19 एप्रिल रोजी राजस्थान रॉयल्स विरुद्ध होणार आहे.

Published by: News18 Desk
First published: April 17, 2021, 9:46 AM IST

ताज्या बातम्या