Home /News /sport /

IPL 2021: CSK च्या 'या' खेळाडूशी धोनीचं दरवर्षी होतं भांडण, माहीनं स्वत: सांगितलं वादाचं कारण

IPL 2021: CSK च्या 'या' खेळाडूशी धोनीचं दरवर्षी होतं भांडण, माहीनं स्वत: सांगितलं वादाचं कारण

महेंद्रसिंह धोनीच्या (MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्सची (Chennai Super Kings) या स्पर्धेत जोरदार वाटचाल सुरू आहे. सीएसकेनं 9 पैकी 7 मॅच जिंकल्या असून ही टीम सध्या नेट रन रेटच्या आधारावर पॉईंट टेबलमध्ये नंबर 1 आहे.

    मुंबई, 25 सप्टेंबर : महेंद्रसिंह धोनीच्या (MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्सची (Chennai Super Kings) या स्पर्धेत जोरदार वाटचाल सुरू आहे. सीएसकेनं 9 पैकी 7 मॅच जिंकल्या असून ही टीम सध्या नेट रन रेटच्या आधारावर पॉईंट टेबलमध्ये नंबर 1 आहे. सीएसकेनं आयपीएल स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात दमदार सुरूवात केली आहे. त्यांनी मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू टीमचा पराभव केला आहे. आता 'प्ले ऑफ' मध्ये  प्रवेश करण्यासाठी चेन्नईला फक्त एका विजयाची गरज आहे. मुंबई इंडियन्स विरुद्धच्या मॅचमध्ये चेन्नईनं (MI vs CSK) विजय मिळवला. पण, या मॅचमध्ये महेंद्रसिंह धोनीचा ड्वेन ब्राव्होशी वाद झाला होता. मुंबईच्या सौरभ तिवारीचा कॅच पकडताना धोनी आणि ब्राव्हो एकमेकांच्या जवळ आले होते. हे दोघं अगदी जवळ आल्यानं तो कॅच सुटला. त्यानंतर धोनी भर मैदानात ब्राव्होवर नाराज झाला होता. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची मॅच संपल्यानंतर धोनीनं ब्राव्होशी नेहमी होत असलेल्या वादाचं कारण सांगितलं आहे. पंत टाकणार सेहवागला मागं, दिल्लीसाठी करणार सर्वात मोठा रेकॉर्ड! ब्राव्होशी नेहमी होतं भांडण धोनीनं शुक्रवारी आरसीबी विरुद्ध मिळवलेल्या विजयाचं श्रेय ब्राव्होला दिलं. . 'ब्राव्हो फिट असून तो चांगली बॉलिंग करत आहे, ही चांगली गोष्ट आहे. मी त्याला भाऊ मानतो. त्यानं स्लो बॉल टाकायला हवा का? याबाबत आमच्यात दरवर्षी वाद होतो. पण, ब्राव्हो अनेकदा तशी बॉलिंग करतो हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे मी विराट कोहलीच्या विरुद्ध त्याला 6 बॉल 6 पद्धतीनं टाकण्यास सांगितले. त्यानंतर जे झालं ते सर्वांना माहिती आहे.' असं धोनी म्हणाला. RCB vs CSK: सलग दुसऱ्या पराभवानंतर विराट नाराज, टीमच्या अपयशाचं सांगितलं कारण आरसीबीनं पहिल्यांदा बॅटींग करताना विराट कोहली (53) आणि त्याचा ओपनिंग पार्टनर देवदत्त पडिक्कल (70) यांच्या चांगल्या खेळीनंतरही आरसीबीनं 6 आऊट 156 पर्यंतच मजल मारली. चेन्नईनं 18.1 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून विजयाचं लक्ष्य गाठलं. चेन्नईकडून ऋतुराज गायकवाडनं सर्वाधिक 38 रन काढले. तर सुरेश रैना 17 आणि महेंद्रसिंह धोनी 11 रन काढून नाबाद परतले. विराट कोहलीसह तीन महत्त्वाच्या विकेट्स घेणारा ब्राव्हो या मॅचमध्ये 'मॅन ऑफ द मॅच' चा मानकरी ठरला.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: IPL 2021, MS Dhoni

    पुढील बातम्या