IPL 2021: धोनीविरुद्ध मॉर्गन वापरणार ट्रम्प कार्ड! दिग्गज खेळाडूचा टीममध्ये समावेश

IPL 2021: धोनीविरुद्ध मॉर्गन वापरणार ट्रम्प कार्ड! दिग्गज खेळाडूचा टीममध्ये समावेश

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (Kolkata Knight Riders vs Chennai Super Kings) यांच्यातील सामन्यात केकेआरनं दोन बदल केले आहेत.

  • Share this:

मुंबई, 21 एप्रिल: कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (Kolkata Knight Riders vs Chennai Super Kings) यांच्यातील सामन्यात केकेआरनं दोन बदल केले आहेत. कोलकाताचा हा मुंबईतील पहिलाच सामना आहे. या सामन्यात त्यांनी हरभजन सिंगच्या जागी (Harbhajan Singh) कमलेश नागरकोटी (Kamlesh Nagarkoti) तर शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) याच्या जागी सुनील नरीनचा (Sunil Narine) टीममध्ये समावेश करण्यात आला आहे.

कोलकाता नाईट रायडर्ससाठी हा सामना महत्त्वाचा आहे. मागच्या दोन लढतीमध्ये त्यांचा पराभव झाला होता. त्यामुळे हा सामना जिंकून दोन पॉईंट्सची कमाई करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. या सामन्याचं महत्त्व लक्षात येताच त्यांनी सुनील नरीनचा टीममध्ये समावेश केला आहे. वेस्ट इंडिजचा ऑफ स्पिनर असलेला सुनील नरीन हा केकेआरचा अनुभवी खेळाडू आहे.

चेन्नईचा कॅप्टन महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) विरुद्ध जबरदस्त रेकॉर्ड आहे. धोनीला आजवर नरीन विरुद्ध एकही फोर लगावता आलेला नाही.  हा रेकॉर्ड पाहूनच केकेआरनं नरीनचा समावेश केला आहे. मुंबईतील सामन्यात धोनी बॅटींगला येताच नरीनला बॉलिंग मिळू शकते.

नरीनची आयपीएल कारकिर्द

केकेआरच्या दोन आयपीएल विजेतेपदात नरीनची मोठी भूमिका होती. त्यानं आयपीएल स्पर्धेत 121 सामन्यात 6.77 च्या इकॉनॉमी रेटनं 127 विकेट्स घेतल्या आहेत. आक्रमक बॅट्समन म्हणूनही नरीनंची ओळख आहे. केकेआरनं त्याचा अनेकदा पहिल्या 6 ओव्हर्सच्या 'पॉवर प्ले' चा फायदा घेण्यासाठी यशस्वी वापर केला आहे. नरीननं आयपीएल स्पर्धेत 164.27 च्या स्ट्राईक रेटनं 892 रन केले आहेत. यामध्ये 4 अर्धशतकांचा समावेश आहे.

चौथ्या प्रयत्नात वॉर्नर यशस्वी! पंजाबचा सलग तिसरा पराभव

कोलकाता नाईट रायडर्सची Playing 11 : शुभमन गिल, राहुल त्रिपाठी, नितिश राणा, इओन मॉर्गन, आंद्रे रसेल, दिनेश कार्तिक, सुनील नरीन, पॅट कमिन्स, कमलेश नागरकोटी, प्रसिद्ध कृष्णा आणि वरुण चक्रवर्ती

चेन्नई सुपर किंग्सची Playing 11 : ऋतुराज गायकवाड, फाफ ड्यू प्लेसिस, मोईन अली, सुरेश रैना, अंबाती रायुडू, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंह धोनी, सॅम करन, शार्दुल ठाकूर, दीपक चहर आणि लुंगी एनगिडी

Published by: News18 Desk
First published: April 21, 2021, 8:06 PM IST

ताज्या बातम्या