• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IPL 2021: '20 ओव्हर मॅच झाली असती तर..' KKR ला पराभूत केल्यानंतर धोनीचं वक्तव्य

IPL 2021: '20 ओव्हर मॅच झाली असती तर..' KKR ला पराभूत केल्यानंतर धोनीचं वक्तव्य

चेन्नई सुपर किंग्सनं (Chennai Super Kings) बुधवारी या आयपीएलमधील (IPL 2021) सलग तिसरा विजय नोंदवला. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या मॅचमध्ये चेन्नईनं कोलकाता नाईट रायडर्सचा (Kolkata Knight Riders) 18 रननं पराभव केला.

 • Share this:
  मुंबई, 22 एप्रिल : चेन्नई सुपर किंग्सनं (Chennai Super Kings) बुधवारी या आयपीएलमधील (IPL 2021) सलग तिसरा विजय नोंदवला. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या मॅचमध्ये चेन्नईनं कोलकाता नाईट रायडर्सचा (Kolkata Knight Riders) 18 रननं पराभव केला. फाफ ड्यू प्लेसिसच्या (Faf du Plessis) नाबाद 95 रनच्या जोरावर पहिल्यांदा बॅटींग करताना 3 आऊट 220 रन काढले. त्यानंतर पॅट कमिन्स (Pat Cummins) नाबाद 66 आणि आंद्रे रसेल (Andre Russell) 54 रन करत जोरदार प्रतिकार केला. पण त्यांचे प्रयत्न अखेर अपुरे ठरले. या मॅचनंतर चेन्नईचा कॅप्टन महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) यानं सांगितले की, "या प्रकारचा सामना माझ्यासाठी (कॅप्टन म्हणून) सोपा असतो. कारण, 15 -16 ओव्हरपासून फास बॉलर आणि बॅट्समन यांच्यात ही लढत होते. जी टीम जिंकली त्यांनी त्यांची रणणिती अधिक योग्य पद्धतीनं राबवली. मात्र 20 ओव्हर्स पूर्ण झाल्या असत्या तर मॅच अधिक रोमांचक झाली असती. प्रत्येक आयपीएल टीममध्ये 'बिग हिटर्स' आहेत. चांगला स्कोअर झाल्यानंतर प्रतिस्पर्धी टीमचा आदर करा, असंच मी खेळाडूंना सांगितलं होतं," असं धोनीनं यावेळी स्पष्ट केलं. 3 मॅचमध्ये फ्लॉप झाल्यानंतरही ऋतुराजला का खेळवलं? धोनीनं सांगितलं कारण 221 चा पाठलाग करताना केकेआरची अवस्था 5 आऊट 31 अशी झाली होती. त्यानंतर रसेल कमिन्स आणि दिनेश कार्तिक यांनी फटकेबाजी करत जोरदार प्रतिकार केला. त्यांचा हा प्रयत्न अखेर कमी पडला. केकेआरचा हा स्पर्धेतील सलग तिसरा पराभव आहे. यापूर्वी चेन्नईकडून फाफ ड्यू प्लेसिसनं (Faf du Plessis) सर्वात जास्त नाबाद 95 रन काढले. 60 बॉलमध्ये 9 फोर आणि 4 सिक्सच्या मदतीनं त्यानं ही खेळी केली.ऋतुराज गायकवाड (Rutruraj Gaikwad) याने आक्रमक 64 रन करत सीएसकेला दमदार सुरुवात करुन दिली.  त्यानं 33 बॉलमध्येच 5 फोर आणि 3 सिक्सच्या मदतीनं या सिझनमधील पहिलं अर्धशतक पूर्ण केलं.  तो अखेर 42 बॉलमध्ये 64 रन काढून आऊट झाला.
  Published by:News18 Desk
  First published: