• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IPL 2021: धोनीनं करुन दाखवलं! 9 वर्षांमध्ये पहिल्यांदाच केली 'ही' कामगिरी

IPL 2021: धोनीनं करुन दाखवलं! 9 वर्षांमध्ये पहिल्यांदाच केली 'ही' कामगिरी

चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) कॅप्टन महेंद्रसिंह धोनीसाठी बुधवारची रात्र खास होती. त्याची 9 वर्षांची प्रतीक्षा अखेर बुधवारी संपली.

 • Share this:
  मुंबई, 22 एप्रिल : चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) कॅप्टन महेंद्रसिंह धोनीसाठी बुधवारची रात्र दोन कारणांमुळे खास होती. पहिलं कारण म्हणजे चेन्नईनं कोलकाता नाईट रायडर्सचा (Kolkata Knight Riders) 18 रननं पराभव केला. हा चेन्नईचा या आयपीएल सिझनमधील (IPL 2021) सलग तिसरा विजय आहे. त्याचबरोबर स्वत: धोनीनंही त्याला गेल्या 9 वर्षांमध्ये न जमलेली कामगिरी केली आहे. कोलकाताविरुद्ध चौथ्या क्रमांकावर बॅटींगला आलेल्या धोनीनं सुनील नरीन (Sunil Narine) याच्या बॉलिंगवर फोर लगावला. धोनीला टी 20 क्रिकेटच्या इतिहासात हे पहिल्यांदाच जमलं आहे. नरीन 2012 पासून आयपीएल स्पर्धेत खेळत आहे.  जगभरातील बॉलर्सची धुलाई करणाऱ्या धोनीला नरीनला पहिला फोर लगावण्यासाठी 9 वर्ष आणि 65 बॉल प्रतीक्षा करावी लागली. धोनीनं 8 बॉलमध्ये 2 फोर आणि 1 सिक्सच्या मदतीनं 17 रन काढले. तो आंद्रे रसेलच्या बॉलिंगवर मॉर्गनकडं कॅच देऊन आऊट झाला. चेन्नईकडून फाफ ड्यू प्लेसिसनं (Faf du Plessis) सर्वात जास्त नाबाद 95 रन काढले. 60 बॉलमध्ये 9 फोर आणि 4 सिक्सच्या मदतीनं त्यानं ही खेळी केली.ऋतुराज गायकवाड (Rutruraj Gaikwad) याने आक्रमक 64 रन करत सीएसकेला दमदार सुरुवात करुन दिली.  या दोघांनी पहिल्या विकेटसाठी  115 रनची पार्टनरशिप केली. IPL 2021: '20 ओव्हर मॅच झाली असती तर..' KKR ला पराभूत केल्यानंतर धोनीचं वक्तव्य चेन्नईकडून दीपक चहर (Deepak Chahar) हा सर्वात यशस्वी बॉलर ठरला.  त्यानं 29 रन देत 4 विकेट्स घेतल्या. दीपक चहरनं पहिल्याच ओव्हरमध्ये शुभमन गिलला आऊट करत केकेआरला पहिला धक्का दिला. गिल शून्यावर आऊट झाला. त्यानंतर चहरनं नितीश राणाला 9 रनवर आऊट केलं. केकेआरचा कॅप्टन इयन मॉर्गन पुन्हा एकदा अपयशी ठरला. त्याला चहरनं 7 रनवर परत पाठवलं. त्याच ओव्हरमध्ये चहरनं सुनील नरीन (4) रनवर आऊट करत कोलकाताला चौथा धक्का दिला. चहरच्या या खतरनाक स्पेलमुळे 5 ओव्हरनंतर कोलकाताची अवस्था 4 आऊट 31 झाली होती.
  Published by:News18 Desk
  First published: