Home /News /sport /

IPL 2021 : 'मेगा ऑक्शनआधी चेन्नईने धोनीला रिटेन करू नये', या क्रिकेटपटूची मागणी

IPL 2021 : 'मेगा ऑक्शनआधी चेन्नईने धोनीला रिटेन करू नये', या क्रिकेटपटूची मागणी

आयपीएल (IPL 2021) च्या पुढच्या मोसमासाठी बीसीसीआय (BCCI) मोठ्या लिलावाच्या तयारीत आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा (Aakash Chopra) याने अशा परिस्थितीमध्ये चेन्नई (CSK)ने धोनी (MS Dhoni) ला सोडून द्यावं, अशी मागणी केली आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 17 नोव्हेंबर : आयपीएल (IPL 2021) च्या पुढच्या मोसमासाठी बीसीसीआय (BCCI) मोठ्या लिलावाच्या तयारीत आहे. पुढच्या हंगामासाठी बीसीसीआय नवीन टीम आणण्याच्या विचारात असल्यामुळे हा मेगा ऑक्शन होऊ शकतो, अशा बातम्या प्रसिद्ध होत आहेत. बीसीसीआयने जर अशा लिलावाचा निर्णय घेतला तर प्रत्येक टीमना त्यांचे काही खेळाडू सोडावे लागतील. भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा (Aakash Chopra) याने अशा परिस्थितीमध्ये चेन्नई (CSK)ने धोनी (MS Dhoni) ला सोडून द्यावं, अशी मागणी केली आहे. यासाठी आकाश चोप्राने कारणही सांगितलं आहे. चेन्नईने त्यांच्या टीममध्ये धोनीला कायम ठेवलं, तर त्यांना 15 कोटी रुपयांचं नुकसान होईल. त्यामुळे धोनीला पुन्हा एकदा लिलावात टाकण्यात यावं आणि मग चेन्नईने राईट टू मॅच कार्ड वापरून धोनीला पुन्हा खरेदी करावं, यामुळे चेन्नईचे पैसेही वाचतील. या वाचलेल्या पैशांमधून त्यांना चांगले क्रिकेटपटू विकत घेता येतील आणि एक चांगली टीमही तयार होईल, असं आकाश चोप्राला वाटत आहे. आकाश चोप्राने त्याच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेयर केला. या व्हिडिओमध्ये तो म्हणाला, 'चेन्नईने धोनीला रिलीज करावं, त्यामुळे तो लिलावाच्या प्रक्रियेत येईल. जर लिलाव झाला तर तुम्ही तीन वर्ष खेळाडूसोबत राहू शकाल, पण धोनी तुमच्यासोबत तीन वर्ष राहिल? धोनीला टीममध्ये ठेवू नका, असं मी म्हणत नाही. धोनी पुढच्या आयपीएलमध्ये खेळेल, पण त्याला रिटेन केलं, तर तुम्हाला 15 कोटी रुपये द्यावे लागतील.' 'जर पुढच्या तीन वर्षांपैकी फक्त एकच मोसम धोन खेळला, तर 2022 साठी 15 कोटी रुपये तुम्हाला दुसऱ्या खेळाडूवर खर्च करता येतील, पण त्यावेळी लिलाव होणार नाही, मग तुम्हाला 15 कोटी रुपयांमध्ये चांगला खेळाडू कुठून मिळणार? मेगा ऑक्शनचा हाच फायदा आहे. जर तुमच्याकडे पैसे असतील, तर तुम्ही चांगली टीम बनवू शकता. धोनीला रिलीज केलं, तर राईट टू मॅच कार्ड वापरून तुम्ही त्याला पुन्हा टीममध्ये घेऊ शकता. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही पैसे देऊन चांगले क्रिकेटपटू विकत घेऊ शकता. चेन्नईसाठी धोनीला रिलीज करुन लिलावात पुन्हा विकत घेणं, त्यांच्यासाठी जास्त फायद्याचा सौदा आहे,' असं वक्तव्य आकाश चोप्राने केलं. 'आयपीएलमध्ये सध्या आठ टीम आहे. पुढच्या वर्षीसाठी लिलावाची सगळ्यात जास्त गरज चेन्नईला आहे. टीमकडे रिटेन करण्यासाठीही जास्त खेळाडू नाहीत. उत्तम टीम बनवायची असेल, तर तुम्ही फाफ डुप्लेसिस आणि अंबाती रायुडू यांच्यासारख्या खेळाडूंवर जास्त खर्च कराल का? जर चांगली टीम बनवायची असेल तर ते रैना आणि हरभजनकडे पुन्हा जाणार नाहीत,' असं मत आकाश चोप्राने व्यक्त केलं. शेन वॉटसनने यावर्षीची आयपीएल संपल्यानंतरच क्रिकेटमधून निवृत्ती घेतली, त्यामुळे तो पुढच्या आयपीएलमध्ये दिसणार नाही. या मोसमात चेन्नईची कामगिरी निराशाजनक झाली. 14 पैकी 6 मॅचमध्ये चेन्नईचा विजय झाला, तर 8 मॅचमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला. आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच चेन्नईला आयपीएलची प्ले-ऑफ गाठता आली नाही.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या