मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

जगातील सर्वात महागड्या बॅटचा आहे धोनी मालक, किंमत वाचून व्हाल थक्क!

जगातील सर्वात महागड्या बॅटचा आहे धोनी मालक, किंमत वाचून व्हाल थक्क!

महेंद्रसिंह धोनीनं (MS Dhoni) क्रिकेटच्या मैदानात अनेक मॅच एकहाती जिंकून दिल्या आहेत. जगातली सर्व टीमना तडाखा देणारा धोनी हा जगातील सर्वात महागड्या बॅटचा मालक आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 22 ऑगस्ट : टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होऊन आता एक वर्ष झाले आहे. या वर्षभरानंतरही धोनीची क्रेझ कायम आहे. धोनीच्या जाहिरातीपासून ते हेअर स्टाईलपर्यंत प्रत्येक गोष्टींची सर्वत्र जोरदार चर्चा होते. धोनीचे बाईक आणि प्राणी प्रेम तर सर्वांना माहिती आहे. तसेच तो आता रांचीमधील फार्म हाऊसवर नियमित शेती देखील करतो. त्याच्या शेतामधील भाज्या स्थानिक बाजारासह विदेशात देखील जातात.

धोनीनं क्रिकेटच्या मैदानात अनेक मॅच एकहाती जिंकून दिल्या आहेत. जगातली सर्व टीमना तडाखा देणारा धोनी हा जगातील सर्वात महागड्या बॅटचा मालक आहे. त्या बॅटच्या किंमतीची नोंद ही 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड' मध्ये देखील झाली आहे. 2011 च्या वर्ल्ड कप फायनलमध्ये धोनीनं याच बॅटनं बॅटींग केली होती. त्यानं फायनलमध्ये नाबाद 91 रनची खेळी केली होती. धोनीनं याच बॅटनं  शेवटी सिक्स लगावत टीम इंडियाच्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले होते.

टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकून देणारी ही बॅट जगात सर्वाधिक महाग आहे. धोनीनं या बॅटला ग्लोबल शेअर अँड सिक्युरिटी लिमिटेड कंपनीकडून 161, 295 डॉलर्स (जवळपास 1 कोटी 20 लाख) पेक्षा जास्त किंमतीमध्ये खरेदी केले होते.

आयपीएलची तयारी सुरू

आयपीएल स्पर्धेचा (IPL 2021) दुसरा टप्पा पुढील महिन्यात यूएईमध्ये सुरू होत आहे. महेंद्रसिंह धोनीनं या स्पर्धेची तयारी सुरू केली आहे. सीएसकेनं एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोमध्ये कॅप्टन महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) आणि सुरेश रैना (Suresh Raina) टीममधील अन्य खेळाडूंसोबत दिसत आहेत.

रोहित, विराटच्या सहकाऱ्यांनी पटकावलं The Hundred स्पर्धेचं पहिलं विजेतेपद

आयपीएलच्या यंदाच्या मोसमाच्या (IPL 2021) दुसऱ्या सत्राला 19 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. मोसमातल्या उरलेल्या 31 मॅच 27 दिवसांमध्ये होणार आहेत. हे सगळे सामने युएईतल्या दुबई, अबुधाबी, शारजाह या तीन स्टेडियममध्ये खेळवले जातील, तर फायनल 15 ऑक्टोबरला दुबईमध्ये होईल. चेन्नई आणि मुंबई (Chennai Super Kings vs Mumbai Indians) यांच्यातल्या सामन्याने हा टप्पा सुरू होईल.

First published:

Tags: Cricket news, MS Dhoni