• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IPL 2021: महेंद्रसिंह धोनी पुढील आयपीएल खेळणार का? CSK नं केला संभ्रम दूर

IPL 2021: महेंद्रसिंह धोनी पुढील आयपीएल खेळणार का? CSK नं केला संभ्रम दूर

आयपीएल 2021 (IPL 2021) स्पर्धेची सांगता होताच महेंद्रसिंह धोनीच्या (MS Dhoni) भवितव्याबाबत चर्चा सुरू झाली आहे. चेन्नई सुपर किंग्सच्या अधिकाऱ्यानं (Chennai Super Kings) या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे.

 • Share this:
  मुंबई, 17 ऑक्टोबर: आयपीएल 2021 (IPL 2021) स्पर्धेची सांगता होताच महेंद्रसिंह धोनीच्या (MS Dhoni) भवितव्याबाबत चर्चा सुरू झाली आहे. चेन्नई सुपर किंग्सच्या (Chennai Super Kings) चौथ्या विजेतेपदामध्ये धोनीच्या कॅप्टनसीचा मोठा वाटा होता. पण, एक बॅटर म्हणून धोनी स्पर्धेत साफ अपयशी ठरला. आता पुढच्या वर्षी होणाऱ्या आयपीएल सिझनमध्ये 40 वर्षांचा धोनी खेळणार की नाही? हा प्रश्न निर्माण झाला आहे. धोनीनं काय दिलं होतं उत्तर? कॉमेंटेटर हर्षा भोगले यांनी फायनल मॅच संपल्यानंतर झालेल्या कार्यक्रमात (presentation ceremony) धोनीला रिटायरमेंटबद्दल प्रश्न विचारला. त्यावेळी  धोनीनं पुढच्या वर्षी आयपीएल खेळण्याबाबत सांगितलं की, 'बरच काही बीसीसीआयवर अवलंबून आहे. कारण, 2 नव्या टीम येणार आहेत. माझ्या फ्रँचायझीला नुकसान व्हावं असं मला वाटत नाही. मी सीएसकेकडून खेळणार की नाही हे फारसं महत्त्वाचं नाही. चेन्नईसाठी बेस्ट काय असेल ते महत्त्वाचं आहे. कोर ग्रुपनं 10 वर्ष टीमला सांभाळलं आहे. आता बेस्ट काय आहे, हे आम्हाला पाहायचं आहे.' असं धोनीनं सांगितलं. त्याचबरोबर मी अजून सोडलेलं नाही, असंही धोनी हसत-हसत शेवटी म्हणाला होता. CSK चॅम्पियन होताच दिग्गज खेळाडूचे करिअर समाप्त, पुढच्या वर्षी होणार टीममधून Out CSK चं स्पष्टीकरण धोनीच्या या उत्तरानं क्रिकेट फॅन्समधील संभ्रम आणखी वाढला होता. अखेर, चेन्नई सुपर किंग्सच्या (CSK) अधिकाऱ्यानं ANI शी बोलताना या विषयावरील संभ्रम दूर केला आहे. 'सीएसके किती खेळाडूला रिटेन करणार आहे, याबाबत अजून स्पष्ट झालेलं नाही. पण महेंद्रसिंह धोनीसाठी हा मुद्दा गैरलागू आहे. कारण टीम त्याच्यासाठी पहिलं रिटेंशन कार्ड त्याच्यासाठी वापरणार आहे.  जहाजासाठी कॅप्टनची गरज असते आणि धोनी पुढच्या वर्षीही परत येणार आहे, याबाबत निश्चिंत राहा' असं या अधिकाऱ्यानं स्पष्ट केलं. MS Dhoni दुसऱ्यांदा बाबा होणार, साक्षीकडे Good News! धोनीनं यापूर्वी चेन्नईमध्ये सीएसकेच्या फॅन्ससमोर रिटायरमेंट घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. जेव्हा अलविदा करायची वेळ येईल तेव्हा तुम्ही येऊ शकता आणि मला सीएसकेकडून खेळताना बघू शकता. तुम्हाला मला अलविदा करण्याची संधी मिळेल. आम्ही चेन्नईमध्ये येऊ आणि अखेरची मॅच खेळू, अशी अपेक्षा आहे. सगळ्या चाहत्यांनाही भेटू,' असं भावुक वक्तव्य धोनीने केलं होतं.
  Published by:News18 Desk
  First published: