मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021: दीपक चहरसाठी धोनी बनला Love Guru, वाचा मैदानातील प्रपोजची Inside Story

IPL 2021: दीपक चहरसाठी धोनी बनला Love Guru, वाचा मैदानातील प्रपोजची Inside Story

दीपक चहरची (Deepak Chahar) गुरुवारी जयाला प्रपोज करण्याची इच्छा नव्हती. पण चेन्नई सुपर किंग्सचा कॅप्टन महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) त्याचा 'लव्ह गुरु' (Love Guru Dhoni) बनला आणि त्यानं प्लॅन बदलला अशी माहिती आता समोर आली आहे.

  • Published by:  News18 Desk

दुबई, 8 ऑक्टोबर : चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) प्रमुख बॉलर दीपक चहरनं (Deepak Chahar) गुरुवारी झालेल्या मॅचनंतर स्टेडियममध्ये त्याची गर्लफ्रेंड जया भारद्वाजला (Jaya Bhardwaj) प्रपोज केलं. लाजाळू स्वभावाच्या दीपकनं पंजाब किंग्ज (Punjab Kings) विरुद्ध झालेल्या मॅचनंतर सर्वांसमोर गुडघ्यावर खाली बसून जयाला प्रपोज केले आणि रिंग घातली. दीपकची गुरुवारी जयाला प्रपोज करण्याची इच्छा नव्हती. पण चेन्नई सुपर किंग्सचा कॅप्टन महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) त्याचा 'लव्ह गुरु' (Love Guru Dhoni) बनला आणि त्यानं प्लॅन बदलला अशी माहिती आता समोर आली आहे.

'दैनिक जागरण'नं दिलेल्या माहितीनुसार चहरची आयपीएल 'प्ले ऑफ' (IPL 2021 Playoff)  दरम्यान प्रपोज करण्याची इच्छा होती. पण, धोनीच्या सूचनेनुसार त्यानं 'प्ले ऑफ'पूर्वीच प्रपोज केले. शेवटची लीग मॅच झाल्यानंतर गर्लफ्रेंडला प्रपोज करण्याची सूचना धोनीनं दिली होती. त्यानंतर चहरन त्याची प्लॅनिंग बदलली.

दीपक चहरची गर्लफ्रेंड जया भारद्वाज दिल्लीतल्या एका कॉर्पोरेट कंपनीमध्ये काम करते. प्रसिद्धीपासून फार लांब असल्यामुळे जयाबद्दल कोणालाच फारशी माहिती नाही. सोशल मीडियावरही ती फारशी ऍक्टिव्ह नसते. एमटीव्ही स्पिल्ट्स व्हिला सिझन 2 चा विजेता असलेल्या सिद्धार्थ भारद्वाजची ती लहान बहिण आहे. सिद्धार्थ भारद्वाज फक्त VJ नाही तर मॉडेलही आहे.

मॅच संपल्यानंतर दीपक लगेचच स्टॅण्डमध्ये गेला आणि त्याने एका गुडघ्यावर उभं राहून गर्लफ्रेंडला लग्नासाठी मागणी घातली. यानंतर स्टॅण्डमध्ये असलेल्या लोकांनीही टाळ्या वाजवल्या. गर्लफ्रेंडने जेव्हा हो म्हणलं तेव्हा दोघांनी एकमेकांना मिठी मारली.

दीपक चेन्नई सुपर किंग्स टीमचा महत्त्वाचा खेळाडू आहे. या आयपीएल सिझनमध्ये त्याची कामगिरी चांगली झाली आहे. त्यानं आजवर 13 मॅचमध्ये 30 च्या सरासरीनं 13 विकेट्स घेतल्या असून 8.36 हा त्याचा इकोनॉमी रेट आहे. 13 रन देऊन 4 विकेट्स ही दीपकची सर्वोत्तम कामगिरी आहे. चेन्नईकडून (CSK) सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या बॉलर्सच्या यादीत तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. सीएसकेकडून सर्वात जास्त 18 विकेट्स शार्दुल ठाकूरनं (Shardul Thakur) घेतल्या आहेत.

पराभवानंतरही CSK कॅम्पमध्ये जल्लोष! धोनी, रैनानं चहरला घातली केकची आंघोळ VIDEO

First published:

Tags: Csk, IPL 2021, MS Dhoni