IPL 2021: मॅच जिंकल्यानंतर धोनीनं टीमसोबत केलं खास सेलिब्रेशन, Video Viral

IPL 2021: मॅच जिंकल्यानंतर धोनीनं टीमसोबत केलं खास सेलिब्रेशन, Video Viral

आयपीएल 2021 (IPL 2021) मध्ये शुक्रवारचा दिवस चेन्नई सुपर किंग्ससाठी (CSK) खास ठरला. या खास दिवसाचा टीमनं तितकंच जोरदार सेलिब्रेशन केलं आहे.

  • Share this:

मुंबई, 17 एप्रिल : आयपीएल 2021 (IPL 2021) मध्ये शुक्रवारचा दिवस चेन्नई सुपर किंग्ससाठी (CSK) खास ठरला. सीएसकेनं पंजाब किंग्जला हरवून स्पर्धेतील पहिला विजय मिळवला. त्याचबरोबर कॅप्टन महेंद्रसिंह धोनीनं (MS Dhoni) सीएसकेसाठी 200 वा सामना खेळला. या दुहेरी आनंदचं टीमनं तितकंच जोरदार सेलिब्रेशन केलं. या सेलिब्रेशनचा व्हिडीओ सीएसकेनं त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर केला आहे.

या व्हिडीओमध्ये महेंद्रसिंह धोनीनं केक कापला आहे. त्याच्या जवळ सुरेश रैना, रवींद्र जडेजा आणि टीममधील अन्य सदस्य उभे आहेत. केक कापल्यानंतर धोनीनं सर्वप्रथम सीएसकेचे मुख्य प्रशिक्षक स्टिफन प्लेमिंग यांना केक भरवला. त्यानंतर टीमचा सपोर्ट स्टाफमधील अन्य सदस्य तसंच सुरेश रैनालाही धोनीनं केक खाऊ घातला. धोनीचा हा कूल अंदाज त्याच्या फॅन्सना जाम आवडला आहे.

टीमच्या कामगिरीवर धोनी खूश

200 व्या मॅचमध्ये मिळालेल्या या विजयाबद्दल महेंद्रसिंह धोनी आनंदी होता. त्यानं या मॅचनंतर बोलताना त्याची आजवरचा आयपीएल प्रवासाचा पट उलगडून दाखवला.  "मला म्हातारा झाल्यासारखं वाटतंय. हा खूप लांबचा प्रवास होता. या प्रवासाला 2008 साली सुरुवात झाली. आम्ही भारत, दक्षिण आफ्रिका आणि युएईमध्ये खेळलो. आता पुन्हा भारतामध्ये परतलो आहोत.  या सिझनमध्ये मुंबई हे आमचं होम ग्राऊंड असेल, याचा कधी विचार केला नव्हता." असं धोनीनं सांगितलं.

पंजाबनं दिलेलं 107 रनचं आव्हान चेन्नईने 4 विकेट आणि 26 बॉल राखून पूर्ण केलं. मोईन अलीने (Moeen Ali) सर्वाधिक 46 रन, तर फाफ डुप्लेसिसने (Faf Duplesis) नाबाद 33 रन केले. पंजाबकडून मोहम्मद शमीने (Mohammad Shami) 2 विकेट घेतल्या, तर अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) आणि मुरुगन अश्विनला (Murugan Ashwin) 1-1 विकेट घेण्यात यश आलं.

त्यापूर्वी दीपक चहरच्या (Deepak Chahar) भेदक बॉलिंगमुळे पंजाबच्या बॅटींगची दाणादाण उडाली. चहरनं फक्त 13 रन देत 4 विकेट्स घेतल्या. चहरच्या घातक स्पेलनंतर पंजाबची टीम सावरलीच नाही. त्यांना निर्धारित 20 ओव्हरमध्ये 8 आऊट 106 रन करता आले. पंजाबकडून शाहरुख खाननं सर्वात जास्त 47 रन केले.

Published by: News18 Desk
First published: April 17, 2021, 2:51 PM IST

ताज्या बातम्या