Home /News /sport /

'पँट का घातली नाहीस..?' ऑस्ट्रेलियन खेळाडूच्या ट्रोलिंगला दिनेश कार्तिकचं मजेदार उत्तर

'पँट का घातली नाहीस..?' ऑस्ट्रेलियन खेळाडूच्या ट्रोलिंगला दिनेश कार्तिकचं मजेदार उत्तर

आयपीएल स्पर्धा (IPL 2021) अचानक स्थगित झाल्यामुळे भारतीय खेळाडू आपआपल्या घरी परतले आहेत. घरी परतल्यानंतर सर्व जण सध्या कोरोना लस (Corona vaccine) घेत आहेत.

    चेन्नई, 12 मे: आयपीएल स्पर्धा (IPL 2021) अचानक स्थगित झाल्यामुळे भारतीय खेळाडू आपआपल्या घरी परतले आहेत. घरी परतल्यानंतर सर्व जण सध्या कोरोना लस (Corona vaccine) घेत आहेत. विराट कोहली, अजिंक्य रहाणे, शिखर धवन, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, चेतेश्वर पुजारा, उमेश यादव या खेळाडूंनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. याच मालिकेत अनुभवी विकेटकिपर बॅट्समन दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) यानं देखील कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. कार्तिकनं कोरोना लस घेतल्याचा फोटो ट्विटरवर शेअर केला. तो फोटो पाहून त्याचा कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) जुना सहकारी ख्रिस लीन (Chris Lynn) यानं त्याला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी कार्तिकनंही त्यावर मजेशीर उत्तर देत ख्रिस लीनची बोलती बंद केली. कार्तिकनं कॅमोफ्लेज ट्राऊजर घालून लस घेतली आहे. तो फोटो  पाहून ख्रिस लीननं  'किमान पँट तरी घालू शकला असतास' अशी प्रतिक्रिया दिली. त्यावर, 'मी तुझ्यासारखंच शॉर्ट घालण्याचा विचार करत होतो. पण मला जाणीव झाली की मी मालदीवमध्ये नाही. त्यामुळे मी हा ड्रेस घातला.'  असं उत्तर कार्तिकनं दिलं. आयपीएल संपल्यानंतर बाकी देशाचे खेळाडू घरी गेले असले तरी ऑस्ट्रेलियन खेळाडू हे सध्या मालदीवमध्ये आहेत. ऑस्ट्रेलियन सरकारनं घातलेली बंदीची मुदत 15 मे रोजी संपणार आहे. त्यानंतर ते घरी परततील. '...अय्यर भाई SEXY', स्वत: श्रेयसनंचं शेअर केला मजेदार VIDEO आक्रमक ओपनिंग बॅट्समन असलेला ख्रिस लीन यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्सचा सदस्य होता. त्याला मागच्या वर्षी झालेल्या आयपीएल लिलावात (IPL 2020 Auction) मुंबई इंडियन्सनं 2 कोटींना खरेदी केलं.  मुंबई इंडियन्सकडून तो आतापर्यंत फक्त 1 मॅच खेळला आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Corona vaccine, Cricket news, Photo viral

    पुढील बातम्या