मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021: सुरेश रैनानं लगावला जबरदस्त सिक्स, धोनीही बघत बसला! पाहा VIDEO

IPL 2021: सुरेश रैनानं लगावला जबरदस्त सिक्स, धोनीही बघत बसला! पाहा VIDEO

आयपीएल 2021 स्पर्धेचा दुसरा सिझन (IPL 2021 Phase 2) सुरू होण्यासाठी आता काही दिवसच शिल्लक आहेत. सर्वच टीमनं 19 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या स्पर्धेची तयारी सुरू केली आहे.

  • Published by:  News18 Desk

दुबई, 4 सप्टेंबर : आयपीएल 2021 स्पर्धेचा दुसरा सिझन (IPL 2021 Phase 2) सुरू होण्यासाठी आता काही दिवसच शिल्लक आहेत. सर्वच टीमनं 19 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या स्पर्धेची तयारी सुरू केली आहे. चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) प्रमुख खेळाडू सुरेश रैना (Suresh Raina) यानं त्याच्या तयारीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. रैनानं लगावलेल्या सिक्सचा हा व्हिडीओ असून तो सोशल मीडियावर वेगानं व्हायरल (Video Viral) होत आहे.

चेन्नई सुपर किंग्सच्या नेट सेशनमधील हा व्हिडीओ आहे. रैनानं मारलेला सिक्स थेट स्टेडियमच्या छतावर गेला. रैनानं या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला रॉकस्टार सिनेमातील प्रसिद्ध गाण्याचा भाग लावला आहे.

View this post on Instagram

A post shared by Suresh Raina (@sureshraina3)

रैनाचा हा शॉट तिथं जवळच उभे असलेले महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) आणि अंबाती रायडू हे बघत बसले. सीएसकेची टीम यूएईमध्ये सर्वात आधी दाखल झालेल्या टीमपैकी एक टीम आहे. रैनाचा हा सिक्स पाहून सीएसकेच्या फॅन्समध्ये आनंदाचं वातावरण आहे. आम्हाला आयपीएलमध्येही हेच हवं, अशी मागणी त्यांनी केली आहे.

इंग्लंडची डोकेदुखी वाढली, चॅम्पियन खेळाडू T20 वर्ल्ड कपमधून माघार घेण्याच्या तयारीत

सुरैश रैनानं आयपीएलच्या मागील सिझनमध्ये वैयक्तिक कारणामुळे माघार घेतली होती. यावेळी तो पुन्हा टीममध्ये परतली आहे. कोरोनामुळे हा सिझन स्थगित झाला तेव्हा सीएसकेची टीम पॉईंट टेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर होती. पण त्यांचे अजूनही 'प्ले ऑफ' चे स्थान नक्की झालेले नाही.

First published:

Tags: Csk, IPL 2021, Suresh raina