Home /News /sport /

IPL 2021 : महेंद्रसिंह धोनीला कडप्पाच्या 'बाहुबली'ने केलं बोल्ड, PHOTO VIRAL

IPL 2021 : महेंद्रसिंह धोनीला कडप्पाच्या 'बाहुबली'ने केलं बोल्ड, PHOTO VIRAL

आयपीएल 2021 (IPL 2021) स्पर्धेची तयारी करत असलेला टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) याला एका तरुण बॉलरनं बोल्ड केले.

    चेन्नई, 18 मार्च : आयपीएल 2021 (IPL 2021) स्पर्धेची तयारी करत असलेला टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) याला एका तरुण बॉलरनं बोल्ड केले. धोनी चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) कॅप्टन असून सध्या टीमसोबत सराव करत आहे. बुधवारी एक प्रॅक्टीस मॅच खेळवण्यात आली. यामध्ये 22 वर्षांच्या एका फास्ट बॉलरनं चेन्नईच्या कॅप्टनला बोल्ड केलं. या फास्ट बॉलरचे नाव हरीशंकर रेड्डी (Harishankar Reddy) असून तो आंध्र प्रदेशातील कडप्पा जिल्ह्यातील खेळाडू आहे. धोनीला आऊट केल्यानंतर कडप्पाचा 'बाहुबली' म्हणजेच हरीशंकर रेड्डीचे फोटो सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहेत. हरीशंकरला या लिलावात फक्त 20 लाख रुपयांमध्ये चेन्नई सुपर किंग्सनं करारबद्ध केले आहे. उजव्या हाताने फास्ट बॉलिंग करणाऱ्या हरीशंकरनं आंध्र प्रदेशकडून विजय हजारे ट्रॉफी आणि सय्यद मुश्ताक अली स्पर्धा खेळली आहे. त्याने 5 लिस्ट A मॅचमध्ये 8 विकेट्स घेतल्या आहेत. तर 13 टी20 मॅचमध्ये 19 विकेट्स त्याच्या नावावर आहेत. या सर्व विकेट्सपेक्षा बुधवारी धोनीला आऊट केल्यानंतर तो अचानक चर्चेत आला आहे. हरीशंकर रेड्डी 14 व्या वर्षांपर्यंत टेनिस बॉल क्रिकेट खेळत होता. तो एके दिवशी मित्रांसोबत क्रिकेटच्या ट्रायलसाठी गेला होता. त्यानंतर त्याचं नशिब बदललं. हरीशंकरने फास्ट बॉलिंगने सर्वांनाच प्रभावित केले आहे. त्याने अगदी कमी कालावधीमध्ये आंध्र प्रदेश आणि चेन्नई सुपर किंग्स टीममध्ये स्थान मिळवले आहे. (हे वाचा-VIDEO: युवराज सिंगचा मैदानातील जलवा कायम! एकाच ओव्हरमध्ये लगावले 4 उत्तुंग सिक्स ) चेन्नई सुपर किंग्सने  या सिझनसाठी तयारी सुरु केली आहे. कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या नेतृत्वाखाली चेन्नईचा ट्रेनिंग कॅंम्प  सुरु असून खेळाडूंनी जोरदार सराव सुरु केला आहे. आयपीएल सुरु होण्यास एका महिन्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक राहिला आहे. त्यामुळे सीएसकेचा कॅप्टन आणि खेळाडूंनी सरावासाठी कंबर कसली आहे. टीम इंडियाचा माजी कर्णधार मागील सिझन विसरुन पूर्ण जोशात तयारीला लागला आहे. मागच्या वर्षी इतिहासात प्रथमच चेन्नई सुपर किंग्ज प्ले ऑफमध्ये पोहचू शकली नव्हती. त्यामुळे या मोसमात टीम जोरदार पुनरागमन करण्याची तयारी करत आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket, Csk, IPL 2021, MS Dhoni

    पुढील बातम्या