Home /News /sport /

IPL 2021: आयपाीएल स्थगित तरी कोरोनाचा धोका कायम, CSK चा स्टार पॉझिटीव्ह

IPL 2021: आयपाीएल स्थगित तरी कोरोनाचा धोका कायम, CSK चा स्टार पॉझिटीव्ह

आयपीएल 2021 (IPL 2021) चा सिझन आता स्थगित करण्यात आला आहे. त्यानंतरही या स्पर्धेतील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. आता चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) बॅटींग कोच मायकल हसी (Michael Hussey) कोरोना पॉझिटीव्ह आढळला आहे.

    नवी दिल्ली, 5 मे : आयपीएल 2021 (IPL 2021) चा सिझन आता स्थगित करण्यात आला आहे. त्यानंतरही या स्पर्धेतील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.  सनरायझर्स हैदराबादचा (SRH) वृद्धीमान साहा (Wriddhiman Saha) आणि दिल्ली कॅपिटल्सचा (DC) अमित मिश्रा (Amit Mishra) या दोघांचा कोरोना रिपोर्ट मंगळवारी पॉझिटीव्ह आला. त्यानंतर ही स्पर्धी स्थगित करण्यात आली. आता चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) बॅटींग कोच मायकल हसी (Michael Hussey) कोरोना पॉझिटीव्ह आढळला आहे. हसीची सोमवारी चाचणी करण्यात आली होती, मंगळवारी त्याचा रिपोर्ट आला. यापूर्वी चेन्नईचा  बॉलिंग कोच लक्ष्मीपती बालाजी (L. Balaji) कोरोना पॉझिटीव्ह आढळला होता. हसीचा पहिला रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर दुसऱ्यांदा चाचणी घेण्यात आली त्यावेळी देखील तोच रिपोर्ट आला. त्याची टेस्ट निगेटीव्ह येईल अशी चेन्नईच्या मॅनेजमेंटला आशा होती. यापूर्वी टीमचे सीईओ काशी विश्वनाथ यांचा पहिला रिपोर्ट पॉझिटीव्ह आला होता. त्यानंतर त्यांचा दुसरा रिपोर्ट निगेटीव्ह आला. चेन्नई सुपर किंग्सची टीम सध्या दिल्लीमध्ये आहे.त्यांनी पहिल्या पाच मॅच मुंबईत खेळल्या होत्या. त्यानंतरच्या दोन मॅच दिल्लीत झाल्या. महेंद्रसिंह धोनीच्या (MS Dhoni) कॅप्टनसीखाली खेळणाऱ्या या टीमनं यावर्षी जबरदस्त कामगिरी केली होती. त्यांनी सातपैकी पाच मॅच जिंक पॉईंट टेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर धडक मारली होती. IPL 2021: 10 मिनिटांच्या बैठकीत झाला स्थगितीचा निर्णय, वाचा Inside Story हसी सुरुवातीपासून चेन्नईचा सदस्य आहे. यापूर्वी तो टीमचा ओपनिंग बॅट्समन होता.त्यानं आयपीएलमध्ये शतक देखील झळकावलं असून तो चेन्नईच्या यशस्वी बॅट्समनपैकी एक आहे. त्यानं एका सिझनमध्ये ऑरेंज कॅप देखील पटकावली होती. हसी चेन्नईसह मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) कडून देखील खेळला आहे. क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर तो टीमचा बॅटींग कोच बनला.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Coronavirus, Csk, IPL 2021

    पुढील बातम्या